Connect with us

गोवा खबर

महसूल अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहने

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

 

 

 

गोवा खबर:महसूल मंत्री श्रीमती जेनिफर मॉन्सेरात यांनी आज उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात उत्तर गोवा जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांकडे १७ नवीन वाहने सुपूर्द केली.

मंत्र्यांनी ८ इलेक्ट्रिकल टाटा नेक्सन आणि ९ महिंद्रा बोलेरो डिझेल वाहनांच्या चाव्या सर्व उपजिल्हाधिकारी, मामलेदार, उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांकडे दिल्या.

यावेळी बोलताना श्रीमती मॉन्सेरात यांनी गोव्यातील महसूल कार्यालय खूप चांगले काम करीत आहेत आणि नवीन वाहनांमुळे ते आणखी चांगले काम करतील आणि महसूल खात्याला उच्च शिखरावर नेतील असे त्यांनी सांगितले.

उत्तर जिल्हाधिकारी श्री अजित रॉय आयएएस यांनी ही नवीन वाहने चालना देऊन अधिक उत्साहाने काम करण्यास नैतिक आधार आणि प्रेरणा देतील असे सांगितले. या नवीन वाहनांमुळे वाहनांसाठी करावा लागणारा संघर्ष संपेल असे ते म्हणाले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी १ श्री गोपाल पार्सेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी २, श्रीमती मामू हागे आयएएस, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री महादेव आरोंदेकर, उपजिल्हाधिकारी श्री गुरुदास देसाई, श्रीमती स्नेहा गिते, आयएएस, श्री रविशंकर निपाणीकर, श्री दीपक वायंगणकर, उत्तर गोवा जिल्ह्याचे मामलेदार आणि जिल्हा प्रशासनाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Continue Reading