Connect with us

गोवा खबर

नोंद नसलेल्या कोविड मृतांचा  आकडा नसल्याने  सरकारची अकार्यक्षमता उघड होते: आप

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर:कोविड व्यवस्थापनात भाजप सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे अशी टिका आम आदमी पक्षाने केली .ऑगस्ट 2020 ते जून 2021 पर्यंत नोंद न झालेल्या कोविड मृत्यूं बाबत प्रतिक्रिया देताना आम आम आदमी पक्षाने राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली’.
मुख्यमंत्री सावंत आणि आरोग्य मंत्री राणे राजकीय डावपेचात  व्यस्त आहेत, ही चौथी वेळ आहे जेव्हा न नोंदविलेले मृत्यू सापडले आहेत त्यामुळे आतापर्यंत हि एकूण संख्या 142 झाली आहे या पार्श्वभूमीवर आप चे संयोजक म्हांबरे यांनी मागच्या न नोंदवलेल्या मृत्यूंचे मृत्युपत्र बुलेटिन जारी करण्याची मागणी केली होती.
“गोवा सरकारने या मृत्यूंचे मृत्युपत्र बुलेटिन जारी केले पाहिजे. यामध्ये मृत्यूचे कारण, प्रवेशाची तारीख, रुग्णाच्या सह-आजार, मृत्यूचे कारण, मृत्यू 24 तासांच्या आत झाला आहे का आणि रुग्णाला लसीकरण केले गेले आहे यासारख्या महत्वाच्या माहिती असतात. अशा डेटाचे विश्लेषण डॉक्टर आणि साथीच्या रोगशास्त्रज्ञांना साथीच्या रोगांच्या भविष्यातील कृती ठरविण्यात मदत करते. 68 न नोंदवलेल्या मृत्यूंची ताजी आकडेवारी ही केवळ मृतांच्या कुटुंबियांचा अपमानच नाही, तर ज्यांनी जीव वाचवण्यासाठी या माहितीवर अवलंबून आहे त्यांच्यासाठी अपमान आहे ”, असा आरोप म्हांबरे यांनी  केला.ही चिंतेची बाब असून या प्रकरणाची  आम्ही न्यायालयीन चौकशीची मागणी करत आहोत आणि तोपर्यंत राणे यांनी नैतिक आधारावर राजीनामा द्यावा ”, अशी मागणी म्हांबरे यांनी केली.

Continue Reading