Connect with us

गोवा खबर

कॉंग्रेस पक्षात फितूरांना स्थान नाही :अवधूत आमोणकर

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
 गोवा खबर: गोव्यात कॉंग्रेस पक्ष आज पुर्ण जोमाने काम करीत असुन, भाजपला धडा शिकवीणे तसेच भ्रष्ट, जातियवादी व असंवेदनशील भाजप सरकारची  सत्ता स्थापन करण्यास मदत करणाऱ्यांना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज आहे. आमच्या पक्षात फितूरांना स्थान नाही असे कॉंग्रेसचे केपें गट कॉंग्रेस अध्यक्ष अवधूत आमोणकर यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे फुटिर आमदार तथा विद्यमान उप-मुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांचे निकटवर्तीय अर्जुन वेळीप यांच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या बातम्यांवर स्पष्टीकरण देताना, केपें गट कॉंग्रेस अध्यक्षांनी त्या कॉंग्रेस विरोधकांनी उठविलेल्या वावड्या असल्याचे सांगितले.
केपें गट कॉंग्रेसचे सर्व सदस्य आज लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी झटत असुन, आम्हाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद व पाठिंबा पाहुन विरोधक धास्तावले आहेत. भाजप व त्यांचे सहकारी आता लोकांना खोटी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे अवधूत आमोणकर म्हणाले.
केपें गट कॉंग्रेस आज नेटाने काम करीत असुन, लोकांच्या अपेक्षा पुर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे. आमचे वरिष्ट निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत तसेच नवनियूक्त कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा यांच्या मार्गदर्शनाखाली व भक्कम पाठिंब्याने आम्ही पक्ष बांधणी करीत आहोत असे अवधूत आमोणकर यांनी म्हटले आहे.

Continue Reading