Connect with us

गोवा खबर

गोव्यातील कर्फ्यूत 7 दिवसांची वाढ;केरळ मधून येणाऱ्यांसाठी 5 दिवस क्वारंटाईन सक्तीचे

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर:कोविडचे संकट केरळमध्ये गंभीर बनत असल्याने केरळहून येणारे विद्यार्थी, कर्मचारी तसेच पर्यटकांना पाच दिवस घराबाहेर संस्थेत ५ दिवस क्वारंटाईन  राहणे सक्तीचे असेल, असे गोवा सरकारने जारी केलेल्या नव्या आदेशात स्पष्ट केले आहे. 
दरम्यान,राज्यातील कर्फ्यू सात दिवसांनी वाढवल्याविषयी जारी आदेशात याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
केरळशिवाय अन्य राज्यांतून येणाऱ्या लोकांना ७२ तासांआधीचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणे सक्तीचे आहे. केरळहून येणाऱ्या लोकांनाही हे सक्तीचे आहेच याशिवाय पाच दिवस क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वेगळे राहण्यासाठीची व्यवस्था संबंधित शिक्षण संस्थांचे प्रशासक वा प्राचार्य करतील. कर्मचाऱ्यांना वेगळे राहण्याची व्यवस्था संबंधित कंपनी वा कार्यालये करतील. पाच दिवसांनंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल,असे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोग्य कर्मचारी, घटनात्मक अधिकारिणी, दोन वर्षांहून लहान मुले, राज्यातून प्रवास करणारे प्रवासी, तसेच आपत्कालीन व्यवस्था यांना ५ दिवस क्वारंटाईन राहणे सक्तीचे असणार नाही.
कर्फ्यूच्या अन्य अटी पहिल्या आदेशाप्रमाणेच आहेत. कॅसिनो, सभागृहे, रिव्हर क्रुज, मसाज पार्लर, शिक्षण संस्था बंदच असतील. चित्रपटगृहे, बार आणि रेस्टॉरंट, जीम ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची मोकळीक कायम आहे.
कर्फ्यू वाढवल्याचा आदेश दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री जारी केला. कर्फ्यूची मुदत २० सप्टेंबर रोजी सकाळी ७पर्यंत वाढवल्याचा आदेश उत्तर गोवा ‌जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे, तर कर्फ्यूची मुदत १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७पर्यंत वाढवल्याचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. त्यामुळे कर्फ्यू १९पर्यंत असणार की २० सप्टेंबरपर्यंत, या विषयी संंभ्रम कायम आहे. उत्तर गोव्यात २० सप्टेंबरपर्यंत कर्फ्यू असेल, तर दक्षिण गोव्यात तो १९ सप्टेंबरपर्यंत असेल, असे आदेशावरून स्पष्ट होते.

Continue Reading