Connect with us

गोवा खबर

प्रमोद सावंत यांचा १०० टक्के लसीकरणाचा दावा खोटा, प्रशंसा मिळवण्यासाठी आणखी एक झुमला: सरदेसाई

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

 

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी राज्यात १०० लसीकरण झाल्याचा जो दावा केला होता तो  100 टक्के खोटा होता हे आरोग्य खात्यानेच  उघड केले आहे, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. 

आरोग्य खात्याने रविवारी जारी केलेल्या बुलेटीन मध्ये सुमारे 1,152 लोकांनी त्या दिवशी त्यांचा पहिला डोस घेतला आहे असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या आठवड्यात दावा केला होता की गोव्याच्या 100% लोकसंख्येला कोविड -19 चा पहिला डोस मिळाला आहे. तथापि, रविवारी आरोग्य विभागाने त्याच्या कोविड लसीकरण बुलेटिनमध्ये सांगितले की 1,152 व्यक्तींनी  त्यांचा पहिला डोस  घेतला आहे.
 “प्रमोद सावंत प्रत्येक वेळी आपली अक्षमता लपवण्याचा प्रयत्न करतात. पण सत्य लपून राहत नाही. त्यांच्या शंभर टक्के लसीकरणाच्या दाव्याच्या बाबतीत असेच घडले आहे, जे आरोग्य विभागाच्या बुलेटिनद्वारे उघड झाले आहे.” असे सरदेसाई म्हणाले.
“नागरिकांना आता 100 टक्के खात्री झाली आहे की  खोटारडेपणा करणाऱ्या या भाजप सरकारला  2022 मध्ये हद्दपार करावे लागेल. नाहीतर त्यांचे झुमले चालूच राहतील.” असे सरदेसाई म्हणाले.
गोव्यामध्ये अजूनही कोविडचे रुग्ण आढळत आहेत आणि अलीकडेच बरे झालेल्यांनी लसीकरण घेतलेले नाही. कदाचित प्रमोद सावंत विसरले आहेत की बरे झालेल्या रुग्णांना तीन महिन्यांनंतर लसीकरण घेण्याचा सल्ला दिला जातो.” असे सरदेसाई म्हणाले.
 “प्रमोद सावंत यांची  खोटे बोलण्याची सवय गोव्याच्या लोकांसाठी नवीन नाही. कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान त्यांनी ग्रीन झोनची बढाई मारली होती आणि त्यांच्या अक्षमतेमुळे गोव्यात कोव्हिडच्या केसीस वाढल्या आणि त्यानंतर दुसऱ्या लाटेतही लोकांचे मृत्यू झाले.” असे सरदेसाई यांनी निदर्शनास आणले.
सरदेसाई म्हणाले की, गोव्याचे लोक जागरूक आहेत आणि सरकारच्या प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर आहे.
 “आतापर्यंत लोकांना प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या खोटाररडेपणाची पूर्ण जाणीव झाली आहे.” असे सरदेसाई म्हणाले.

Continue Reading