Connect with us

गोवा खबर

स्वहितासाठी सावंत सरकारकडून खाण अवलंबितांना मनस्ताप: आप

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
 गोवा खबर:खाण प्रश्नी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम आदमी पक्षाने स्वागत केले आहे, या निर्णयामुळे गोव्यातील खाण पट्ट्यांचा स्पर्धात्मक बोलीद्वारे लिलावासाठी पुष्टी मिळाली असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने दिली . 
राज्य सरकारने सध्याच्या खाण पट्ट्यांचे नूतनीकरण करण्याच्या केलेल्या असफल प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आम आदमी पक्षाचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी  राज्य सरकारवर टीका केली . राज्य सरकारच्या या कारभारामुळे राज्याची अर्थव्यवस्था ढासळून खाण अवलंबितांना वर्षानुवर्षे मनस्थाप सहन करावा लागल्याबद्दल सावंत सरकारवर म्हांबरे यांनी टीका केली आहे.खाण अवलंबितांना आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला भाजप सरकारच्या स्वार्थमुळे  नुकसान झाले आहे अस राहुल म्हांब्रे म्हणाले.
राज्याच्या हितासाठी राज्य सरकाने खाण महामंडळ स्थापन केले असते तर खाणी सुरु झाल्या असत्या अस मये चे आप नेते उपेंद्र गांवकर म्हणाले की, आताही, जीएमडीसी विधेयक विधानसभेने मंजूर केल्यानंतर, मुख्यमंत्री सावंत सरकार टाळाटाळ करत आहेत ,ते राज्यपालांकडे या बिला संदर्भात का पाठपुरावा  करत नाही? असा सवाल गावकर यांनी उपस्थित केला.
नुकतेच ‘आप’ने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना विधेयकाला जलद मंजुरी देण्याची विनंती केली, मात्र हेतुपूर्वक हे विधेयक राजभवनात अडकवून ठेवत असल्याचा आरोप गावकर यांनी केला
आम आदमी पक्षाने खाण अवलंबिताना  आधीच संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे भाजप सरकारच्या कुटनीतीचा पर्दाफाश करण्यासाठी आप पक्ष  खाण पट्टीतील मतदारसंघांसाठी मोहीम राबवेल.अशी माहिती आप चे नेते गौरीशा गांवकर यांनी दिली

Continue Reading