Connect with us

गोवा खबर

माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज यांच्यातर्फे घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर:पणजी मनपाचे माजी महापौर तथा ताळगावचे काँग्रेस नेते टोनी रॉड्रिग्ज यांनी ताळगाव मतदार संघ मर्यादित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ही स्पर्धा 9 सप्टेंबर पासून 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 पर्यंत खुली असणार आहे.
विजेत्याना 15 हजार,10 हजार आणि 5 हजार रूपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.याशिवाय 1 हजार रूपयांची 10 उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छीणाऱ्या भावीकांनी घरच्या गणपती सोबत काढलेली सेल्फी पाठवणे आवश्यक आहे.घरगुती गणपती सजावट इको फ्रेंडली असणे आवश्यक आहे. ताळगाव मतदार संघातील निवासाचा पुरावा असणे आवश्यक आहे.गणेश सजावटीचा फोटो काढताना त्यावर तारीख असणे गरजेचे आहे.परीक्षकांचा निर्णय अंतिम असणार आहे.
स्पर्धकांनी आपल्या गणेशोत्सव सजावटीचे फोटो 8766594614,9881284242 किंवा 9823156666 या क्रमांकावर पाठवावेत असे रॉड्रिग्ज यांनी कळवले आहे.

Continue Reading