Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोमंतकीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणाले “गणेश चतुर्थी हा सर्वांचा आवडता आणि गोव्यात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण आहे. हा सण सर्व आप्तजन व मित्र परिवाराला; प्रेमाच्या व एकत्र येण्याच्या भावनेने प्रफुल्लित करणारा सण आहे. देवाच्या आपल्या घरी होणाऱ्या आगमनाने वातावरण प्रसन्न होते”.

गणेश चतुर्थी हा सण आमच्या स्वयंपूर्णतेचे प्रेरणास्तोत्र आहे. गोमंतकाच्या तांबड्या मातीत पिकलेली माटोळी आमच्या संपुर्णतेचे प्रतीक आहे. मातीपासून बनलेल्या मूर्तिची प्रतिष्ठापना करताना, आम्ही या गोमंतभूमीच्या क्षमतेचे सामर्थ्य समजून घेणे अत्यावश्यक आहे.

पुढे मुख्यमंत्री म्हणतात,चतुर्थीचे पावित्र्य जपताना आमचे गतवैभव पुनःस्थापित करण्याचे ध्येय निश्चित करूया. चतुर्थी ज्याप्रमाणे गोव्यात साजरी होते, त्यात आपल्या रितीभाती आणि निराळ्या पद्धतींमुळे आम्हाला आवर्जून हंगामी भाज्या आणि घरघुती पदार्थ बनविण्याची संधी देते. या पदार्थांचा वापर केवळ सण साजरा करण्याइतपतच नसतो, तर आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातूनही  फायद्याचा ठरतो.

आपलं राज्य स्वयंपूर्ण करण्याच्या या प्रवासात, आपण सर्वांनी मिळून हा निश्चय करू, की आपल्या शेतकरी बंधूंना व स्वयंसेवी मंडळांना, वार्षिकरित्या त्यांची उत्पादने खरेदी करून त्यांना मनापासून मदत करू.

आपल्या राज्याला कोविडमुक्त करण्यासाठी सर्वांनी गोवा सरकारची जी मदत केली आणि ज्या रित्या आपली जबाबदारी समजून ती पार पाडली, त्यासाठी मी ही संधी घेऊन माझ्या सर्व मित्र परिवारांना, मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. तसेच तुम्हा सर्वांना ही आनंदाची बातमी कळवतो, की आपल्या राज्यात ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. आपण कोविड मुक्त होण्याच्या दिशेने लगबगीने पुढची वाट चालत आहोत.

माझ्या प्रिय गोमंतकीयांशी माझी मनापासूनची अपेक्षा आहे, की याच जबाबदरीने आपला आवडता सण, आपण तितक्याच  जल्लोषात व भक्तिभावाने साजरा करूया.

तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Continue Reading