Connect with us

गोवा खबर

पर्रिकरांचा भ्रष्ट व कपटी वारसा गोमंतकीय कदापी पुढे नेणार नाहीत : तुलीयो डिसोजा

Published

on

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

 

   

   गोवा खबर: माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकरांनी केवळ सत्ता मिळवीण्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळ मांडला हे गोमंतकीयांना आता पुर्णपणे पटले आहे. स्व. मनोहर पर्रिकरांचा भ्रष्ट व कपटी वारसा गोमंतकीय कदापी पुढे नेणार नाहीत, असा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते आर्कीटेक्ट तुलीयो डिसोजा यांनी केला आहे.

  भाजपने विधानसभा निवडणूकांसाठी प्रभारी म्हणुन नियूक्त केलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पर्रिकरांचा वारसा पुढे नेणार असल्याच्या केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना तुलीयो डिसोजा यांनी भाजपवर पलटवार केला आहे.
  स्व.  पर्रिकर यांनी आरोप केलेल्या ३५ हजार कोटींच्या खाण घोटाळ्याच्या वसुलीचे काय झाले यावर भाजप उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहे. भाजपने बाळगलेल्या मौनाने स्व. पर्रिकरांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणविसांनी हिम्मत असेल तर स्व. मनोहर पर्रिकरांनीच  नमुद केलेला सार्वजनीक लेखा समितीचा अहवाल लोकांसमोर ठेवावा असे उघड आव्हान तुलीयो डिसोजा यांनी दिले आहे.
  गोवा लोकायुक्तांनी चौकशी करण्याची आदेश दिलेली २१ प्रकरणे  पर्रिकरांच्या भ्रष्ट कारभाराचे ज्वलंत उदाहरण आहे. न्यायालयाने रद्द केलेल्या बेकायदेशीरपणे नुतनीकरण केलेल्या ८८ खाण लिजांसाठी पर्रिकरच जबाबदार होते.
  पर्रिकरांची कारकीर्द यु-टर्न, खोटारडेपणा व फसवेगीरीसाठी लोकांच्या स्मरणात राहिल. त्यांचा वारसा पुढे नेणारे राजकीय पक्ष व व्यक्तींना गोमंतकीय कदापी पाठींबा देणार नाहीत असे तुलीयो डिसोजा म्हणाले.
   पर्रिकरांनी नेहमीच स्वार्थाचे राजकारण केले. आपल्या राजकीय सोयीसाठी त्यांनी अनेक वेळा तत्वे खुंटीला टांगली. त्याची राजवट हुकूमशाहीची होती.

  Continue Reading