Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, श्री गणेशाला देवांच्या देवघरात एक विशेष स्थान देण्यात आले आहे.   देवांमध्ये गणपतीला प्रथम सन्मान देण्यात आला आहे.  त्यामुळे, कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमाची किंवा पूजेची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते. गणरायाला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते, जो सर्व अडथळे दूर करणारा आणि यशाचा स्वामी आहे. याच कारणामुळे 1920 पूर्वी स्वातंत्र्यलढ्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या लोकमान्य टिळकांनी भारतातील सर्व लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने, गणेश चतुर्थीला राष्ट्रीय सण म्हणून लोकप्रिय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, जे जाती आणि समुदायाची पर्वा न करता सर्वांसाठी एकत्र येण्याचे बैठक स्थळ झाले.

राज्यपाल पुढे म्हणतात, गणेश चतुर्थी हा एक अद्वितीय आणि लोकप्रिय सण आहे ज्यामुळे सौहार्द, सुसंवाद आणि परस्पर सामंजस्य वाढते.  हा सण विविधतेतील एकतेच्या तत्त्वावरील आपल्या विश्वासाला दृढ बनवितो.  गोव्यात गणेश चतुर्थीचा उत्सव हिंदू समाजाकडून भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो, ज्यामुळे गोवा राज्य समाजातील ऐक्य आणि आध्यात्मिक सौहार्दाचे प्रतीक आहे.

ते म्हणाले, “यंदा सरकारने लोकांना सावधगिरी म्हणून कोविडच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून सण साजरा करण्यास सांगितले आहे. आपण गोव्यातील सर्व लोकांना एसओपी चे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि सुरक्षित आणि निरोगी राहण्याचे आवाहन करू इच्छितो.”

या शुभ प्रसंगीगणराया प्रत्येक घरावर कृपा करो आणि सर्वांना  विपुल यशआनंद आणि समृद्धीचा आशीर्वाद देवोअसे  राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Continue Reading