Connect with us

गोवा खबर

सरकारने लोहिया मैदानावरील हुतात्मा स्मारक २४ तासात सुरक्षित स्थळी न हलविल्यास, कॉंग्रेसचे कार्यकर्ते ते पुण्यकर्म करणार : गिरीश चोडणकर

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर:  गोव्यातील मुर्ख मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील निर्लज्ज भाजप सरकारला गोवा मुक्तीसाठी सर्वस्व दिलेल्या हुतात्म्यांबद्दल तसेच स्वातंत्र्यसैनीकांबद्दल आदर नाही. लोहिया मैदानावरुन गायब झालेला डॉ. लोहियांचा पुतळा काल कंत्राटदाराच्या गोदामात सापडला. दुर्देवाने तेथील हुतात्मा स्मारक मात्र लोहिया मैदानावरच आज उघड्यावर टाकुन दिल्याचे आढळुन आले आहे.
सरकारने जर सदर हुतात्मा स्मारक येत्या २४ तासात सुरक्षित स्थळी हलविले नाही तर कॉंग्रेसचे कार्यकर्ते सदर पुण्यकार्य करतील असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंताना दिला आहे.
भाजप सरकार गोव्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनीक व हुतात्म्यांचा वारंवार अपमान करीत आहे.  भाजपचे बेगडी देश प्रेम यातुन उघड होत आहे असे गिरीश चोडणकर म्हणाले.
लोहिया मैदानावरील पुतळा तसेच हुतात्मा स्मारक व तेथील ऐतिहासीक नामफलक हे केवळ अधिकृत व तज्ञांच्या देखरेखीखाली व स्वातंत्र्यसैनीकांच्या मार्गदर्शनाखाली हाताळणे गरजेचे आहे.
आज दिवाळखोर झालेले भाजप सरकार ऐतिहासीक दस्तऐवज, पुतळे तसेच स्मारके क्रोनी क्लबला विकण्यासही मागे पुढे पाहणार नाही असा टोला गिरीश चोडणकर यांनी हाणला आहे.