Connect with us

गोवा खबर

चतुर्थीसाठी जारी केलेली कोविड नियमावली मागे घेण्याने भाजपचा मुर्खपणा उघड :अमरनाथ पणजीकर

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : यंदाच्या श्री गणेश चतुर्थीसाठी भाजप सरकारने जारी केलेली कोविड नियमावलीने भाजप सरकारच्या मुख्यमंत्री डॉं. प्रमोद सावंतांचा मुर्खपणा उघड झाला आहे. सपशेल अपयशी ठरलेले तसेच भ्रष्ट, अकार्यक्षम व असंवेदनशील भाजप सरकार आता माघारी फिरण्याच्या तयारीत असुन, सरकारचे घडे भरले आहेत अशी जोरदार टीका कॉंग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
काल सरकारनेच जारी केलेल्या कोविड नियमावलीवर प्रतिक्रीया देताना डॉ. प्रमोद सावंतानी आपलेच हसे करुन घेतले. डोके नसलेल्या भाजप सरकारवर त्यानीच जारी केलेली नियमावली काही तासातच मागे घेण्याची पाळी येणे यावरुन सरकारचा मुर्खपणा स्पष्ट होतो.
भाजपने धर्म, राष्ट्रवाद, संस्कृती यांचा नेहमीच केवळ राजकीय स्वार्थासाठी वापर केला आहे. भाजपवाल्याना देश प्रेम, धार्मिक भावना यांच्याशी काहीच देणेघेणे नाही. भटजींना लोकांच्या घरी पूजेस जाण्यास बंदी करणारा आदेश जारी करुन भाजप सरकारने आपले खरे रुप दाखवुन दिले असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला.
आज राज्यात भाजप सरकार विरूद्ध जनाक्रोश वाढत आहे व त्यामुळेच सरकारचे मानसिक संतुलन बिघडले आहे. मुख्यमंत्री, इतर मंत्री व भाजप पदाधिकाऱ्यांना लोकक्षोभास तोंड द्यावे लागत असल्यानेच ते बेताल वक्तव्ये व निर्णय घेत आहेत.
सदर कोविड नियमावली ही तज्ञांच्या सल्ल्याने जारी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हिम्मत असेल तर भटजींवर बंदी घालणारी सुचना कुठल्या तज्ञानी केली होती याची माहिती नावांसकट डॉ. प्रमोद सावंतांनी जनतेसमोर ठेवावी असे आव्हान अमरनाथ पणजीकर यांनी दिले.
कोविड चाचणी, आयव्हरमेक्टीन गोळ्यांचा वापर, ऑक्सिजनची कमतरता अशी अनेक अपयशे झाकण्यासाठी भाजप सरकारने नेहमीच तथाकथीत तज्ञ समितीचा आधार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आमचे आव्हान स्विकारावे व आज पर्यंतचे चुकीचे सल्ले देणाऱ्या सर्व तज्ञांची नावे उघड करावीत.

Continue Reading