Connect with us

गोवा खबर

प्रशांत क्षेत्र हवाईदल प्रमुख चर्चासत्र 2021 (PACS-21)

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  


 

गोवा खबर:एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएम एडीसी, हवाईदल प्रमुख (सीएएस) 30 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 21 दरम्यान जॉइंट बेस पर्ल हार्बर-हिकम, हवाई येथे पॅसिफिक  एअर चीफ्स सिम्पोजियम 2021 (पीएसीएस -21) अर्थात प्रशांत क्षेत्र हवाईदल प्रमुख चर्चासत्र 2021 मध्ये उपस्थित होते. “प्रादेशिक स्थिरतेच्या दिशेने शाश्वत सहकार्य” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांचे हवाईदल प्रमुख उपस्थित होते. हवाईदल प्रमुखांना परिसंवादाचे डीन म्हणून नामांकित करण्यात आले. 

प्रादेशिक सुरक्षा आणि हवाई डोमेन जागृतीचे महत्त्व, मानवीय आणि आपत्ती निवारण कार्यासाठी हवाई दलांमध्ये सहकार्य यासारख्या विषयांवर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा, अनौपचारिक चर्चा आणि मुख्य भाषणांद्वारे चर्चासत्र संपन्न झाले.

चर्चासत्रात सहभागी होण्याव्यतिरिक्त, हवाईदल प्रमुखांनी अमेरिकेच्या हवाईदलाचे जनरल चार्ल्स क्यू ब्राउन, जूनियर चीफ ऑफ स्टाफ, आणि पॅसिफिक हवाई दलाचे कमांडर जनरल केनेथ एस विल्स्बाक यांची भेट घेतली. त्यांनी इतर अकरा देशांच्या हवाई दल प्रमुखांसोबत संरक्षण सहकार्य आणि सुरक्षेबाबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठकाही घेतल्या.

PACS 2021 मधील सहभागामुळे समविचारी राष्ट्रांशी परस्पर समंजसपणा आणि संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळाली.

 

Continue Reading