Connect with us

क्रीडा खबर

१२ डिसेंबर २०२१ रोजी होणार एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉन

Published

on

Spread the love

 

गोवा खबर : भारतातील अग्रगण्य बेअरिंग बनवणारी कंपनी एसकेएफ इंडियाने आज गोवा रिव्हर मॅरेथॉनसोबत (जीआरएम) आपली भागीदारी जाहीर केली. वास्को स्पोर्ट्स क्लबतर्फे ( व्हीएससी ) रविवार १२ डिसेंबर रोजी चिखली, वास्को दि गामा येथे ११ व्या एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

मॅरेथॉन चिखली पंचायत मैदान येथे सुरू होईल व येथेच संपेल. यावेळी तीन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४२ किलोमीटर ( फुल मॅरेथॉन ) , २१ किलोमीटर ( अर्ध मॅरेथॉन ) आणि १० किलोमीटर स्पर्धेचा समावेश असणार आहे. याशिवाय १० आणि २१ किलोमीटरच्या प्रमोशन रन्सचा समावेश करण्यात येणार आहे. धावपटू आजपासून एसकेएफ गोवा रिव्हर  मॅरेथॉनसाठी www.skfgoarivermarathon.com या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात.

व्हीएससीचे अध्यक्ष नितीन बांदेकर म्हणाले की स्पर्धकांच्या सुरक्षिततेचा विचार करता एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनसाठी काही ठराविक धावपटूनाच एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या अथलिट्सना प्राधान्य देण्यात येईल. ऑनलाईन नोंदणी दरम्यान अथलिट्सनी पूर्ण लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. सहभागी धावपटूची सुरक्षितता जपणे हे आमचे प्राधान्य असेल. यावेळी सरकारतर्फे घालण्यात आलेल्या सर्व नियमावलींचे ( एसओपी) पालन करण्यात येईल

एसकेएफ इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मनीष भटनागर म्हणाले की ” आज एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉन ही देशातील एक लोकप्रिय मॅरेथॉनपैकी एक आहे. आम्ही या उपक्रमाला आमचा पूर्ण पाठिंबा देणार आहोत. भारतात कोविडचा प्रभाव कमी होत असताना एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनचे आयोजन करणे धावपटूसाठी आनंदाची बातमी आहे. वास्को स्पोर्ट्स क्लबसोबत भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. धावण्याचा आनंद आणि मानवी ऊर्जेची शक्ती साजरी करण्यासाठी एक समुदाय म्हणून एकत्र येण्याची ही संधी आहे.”  मुख्य उपक्रमा व्यतिरिक्त एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनतर्फे  राज्यभरात प्री इव्हेंट धावण्याच्या स्पर्धा आयोजित करणार आहे. याशिवाय हौशी आणि तज्ञ धावपटूनना मॅरेथॉनबाबत ज्ञान देण्यासाठी ‘ते कसे करावे?’ कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Rakesh Unny, secretary, Vasco Sports Club said म्हणाले की एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉन ही भारतातील एक अवघड मॅरेथॉन समजली जाते. यामध्ये गोव्याच्या निसर्ग सौंदर्याचा आणि प्रदूषण मुक्त वातावरणाचा अनुभव मिळतो. यावर्षी आम्ही प्लास्टिक मुक्त मॅरेथॉन आयोजित करणार आहोत. मॅरेथॉनच्या ८० टक्के रस्त्याच्या एका बाजूला जुवारी नदी तर दुसऱ्या बाजूला हिरवेगार डोंगर आहेत, यामुळे मॅरेथॉन खेळणाऱ्यांना रस्त्यावर बहुतेक ठिकाणी सावलीतून पळावे लागेल.

स्पर्धेसाठी नोंदणी २ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता www.skfgoarivermarathon.com या संकेतस्थळावर सुरू होईल आणि रविवार दिनांक २८ नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत चालू राहणार आहे.

Continue Reading