Connect with us

क्रीडा खबर

राष्ट्रीय ट्रायथलॉन पात्रता फेरीसाठी  गोवा ट्रायथलॉन संघटना पाठवणार संघ

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

 

 

गोवा खबर: चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता फेरीसाठी गोव्यातील ट्रायथलॉन संघटना आपला संघ पाठवणार आहे. ही स्पर्धा २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

याबाबत शुक्रवारी काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात गोवा ट्रायथलॉन संघटनेच्या सचिव आणि आयर्नमॅन ट्रायथलीट निशा मडगावकर यांनी सांगितले की भारतीय ट्रायथलॉन महासंघाच्या सहयोगाने तामिळनाडू ट्रायथलॉन संघटना २४ ते२६ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे या स्पर्धेचे आयोजन करत आहे.

मडगावकर यांनी सांगितले की २०२२ मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ आणि आशियायी स्पर्धांसाठी ही पहिली पात्रता फेरी असेल. ही स्पर्धा पौरुर,चेन्नई येथील श्री रामचंद्र विद्यापीठाच्या सेंटर फॉर स्पोर्ट्स सायन्स येथे होणार आहे.

मडगावकर म्हणाल्या की ज्या अथलिट्सनी स्प्रिंट डिस्टन्स, ऑलिम्पिक डिस्टन्स आणि मिक्सड रिले ( सांघिक) सर्वोत्तम कामगिरी केली आहे त्यांना राष्ट्रीय शिबिरासाठी बोलावले जाईल. तसेच त्या अथलिट्लचा २०२२ साली बर्मिंगहॅम ,युके येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ खेळांसाठी व हांगझोऊ, चीन येथे होणाऱ्या आशियायी खेळासाठी भारतीय संघासाठी विचार केला जाईल. मात्र याबाबत अथलिट्लच्या खेळाचा चांगला दर्जा आणि केंद्र सरकारची परवागी असणे आवश्यक आहे.मडगावकर यांनी सांगितले की राष्ट्रीय पात्रता फेरीत खालील खेळांचा समावेश असणार आहे.

ट्रायथलॉन स्टॅंडर्ड डिस्टन्स ( १८ वर्षांवरील पुरुष आणि महिला) ,ट्रायथलॉन मिश्र दुहेरी संघ ( १६ वर्षांवरील ) ,ट्रायथलॉन सुपर स्प्रिंट डिस्टन्स ( १४ -१५ वयोगटातील पुरुष आणि महिला ), ट्रायथलॉन स्प्रिंट डिस्टन्स (१६-१७ वयोगटातील पुरुष आणि महिला), ट्रायथलॉन स्टँडर्ड डिस्टन्स ( ४० वर्षांवरील पुरुष आणि महिला )आणि पॅरा ट्रायथलॉन ( १८ वर्षांवरील पुरुष आणि महिला ).

ट्रायथलीटना कृत्रिम तलावात पोहून मग सायकल चालवून नंतर महाविद्यालयातील डांबरी रस्त्यावर पळावे लागेल.

राष्ट्रीय ट्रायथलॉन पात्रता फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी गोवा ट्रायथलॉन संघटनेच्या सचिव निशा मडगावकर यांच्याशी ९८२२१२७२०१ या क्रमांकावर अथवा madgavkarnisha@gmail.com या ईमेलवर ३ सप्टेंबर २०२१ पूर्वी संपर्क साधावा.

Continue Reading