Connect with us

गोवा खबर

कला – संस्कृती खात्याची माटोळी व देखावा स्पर्धा जाहीर

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

४ ऑगस्ट पासून अर्ज उपलब्ध, ३ सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारणार

गोवा खबर:गणेश चतुर्थी. मुर्तीकार, चित्रकार, कारागीर, रचनाकार आदी विविध प्रांतातील कलाकारांच्या प्रतिभेला नवा आयाम देतानाच परंपरेचे जतन करीत गोयकारांच्या मना मनात आपलेपणा जपलेला महत्वाचा सण आहे. या निमित्त घेण्यात येणारी गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाची राज्य स्तरीय माटोळी आणि देखावा स्पर्धा जाहीर झाली आहे.

गोमंतकीय हिंदु धर्मियांमध्ये महत्वाचा मानलेल्या या सणानिमित्त गणेश पूजनासोबतच परंपरेन माटोळी बांधली जाते. माटोळीला बांधण्यात येणारी फळे व वस्तुंना धार्मिकतेसोबतच औषधी गुणधर्मही आहेत.  ही परंपरा व संस्कृती लोप न पावता तिचे जतन आणि संवर्धन व्हावे, नव्या पिढीला या अभिजात परंपरेची ओळख व माहिती व्हावी या उद्देशाने खात्याने माटोळी स्पर्धा सूरू केली आहे. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेश पूजनासोबतच अनेक कलाकारांचे हात राबत असतात. त्यांच्या कलाकौशल्याला वाव मिळावा व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देखावा स्पर्धेचेही आयोजन केले जाते.  या दोन्ही स्पर्धांना राज्य भरातून चांगला प्रतिसाद मिळत असतो.  या दोन्हीही स्पर्धा राज्य स्तरावर घेण्यात येतील. त्याचे बक्षि‍सांचे स्वरूप खालील प्रमाणे.

            या वर्षी माटोळी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक  रू. १५,००० (पंधरा हजार फक्त), द्वितीय  पारितोषिक रु. १०,००० (दहा हजार फक्त), तृतीय पारितोषिक –रु. ७,५०० (सात हजार पाचशे फक्त), तसेच रु. ५,००० (पाच हजार फक्त) ची पांच उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील.  तर देखावा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिकरू. २५,००० (पंचवीस हजार फक्त), द्वितीय  पारितोषिकरु. २०,००० (वीस हजार फक्त), तृतीय पारितोषिक –रु. १५,००० (पंधरा हजार फक्त), तसेच रु. ७,००० (सात हजार फक्त) ची पांच उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. स्पर्धेत आवश्यक स्पर्धक संख्या कमी झाल्यास ही स्पर्धा राखून ठेवण्याचा वा रद्द करण्याचा अधिकार खात्याला राहील.

या स्पर्धेचे अर्ज कला आणि संस्कृती संचालनालय संस्कृती भवन पाटो, पणजी-गोवा, रविंद्र भवन – मडगाव, रविंद्र भवन – कुडचडे, रविंद्र भवन – साखळी, रविंद्र भवन – बायणा- वास्को व राजीव गांधी कला मंदीर, फोंडा येथे मंगळवार दिनांक २४ ऑगस्ट २०२१ पासून उपलब्ध असतील. पूर्ण भरलेले अर्ज शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर २०२१  पर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील. हे अर्ज कला आणि संस्कृती संचालनालयाच्या www.artandculture.goagov.inया संकेत स्थळावर उपलब्ध असतील. अर्जदाराला रु. १०(दहारुपये) अर्ज शुल्क भरावे लागेल. तरी संबंधीत व्यक्ति व गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेला दरवर्षाप्रमाणेच या वर्षीही मोठा प्रतिसाद द्यावा असे आवाहन कला आणि संस्कृती संचालनालयतर्फे करण्यात आले आहे.

Continue Reading