Connect with us

क्राइम खबर

गोयंकरांचा आवाज शांत करण्यासाठी पोलिस दलाचा गैरवापर थांबवा:आप

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

 

गोवा खबर:‘आप’ नेते आणि कार्यकर्त्यांना घाबरवण्यासाठी पोलिस दलाच्या गैरवापराचा आम आदमी पक्षाने आज निषेध केला. या धमकीनंतरही आम्ही कधीही मागे हटणार नाही हे म्हणत,आप ठामपणे उभा राहिले  आणि गोवा नष्ट करणारे कांग्रेस व भाजप यांच्यातील संबंध आप उघडकीस आणत राहिल.

‘आप’ने हे स्पष्ट केले की, हिंसाचारात सामील असलेल्या आणि आपच्या  कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या कांग्रेस मधून भाजपात गेलेल्या आमदार विल्फ्रेड “बाबूशन” समर्थकांविरूद्ध कोणतीही कारवाई करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत.
आप गोव्याचे कार्यकर्ते पहिल्या दिवशी शांततापूर्ण निषेध करण्याकरिता गेले होते. तथापि आमच्यावर हिंसाचार झाला. दुसर्‍या दिवशीही पोलिस उपस्थिती असूनही आमच्या सोबत हिंसाचार झाला. आणि ही  धक्कादायक बाब आहे की, पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या भाजपावर नव्हे तर हिंसाचाराला तोंड देणाऱ्या आप नेत्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे! आप गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे हे त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याबद्दल शोकसभेत असताना त्यांना नोटीस बाबत सूचना मिळाली. राहुल म्हांबरे यांच्याबरोबरच आप गोव्याच्या संयोजक प्रतिमा कुतिन्हो यांनाही नोटीस मिळाली आहे.
राहुल म्हांबरे यांना त्यांच्यावर कोणतीही केस नसतानाही 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मैना कुडतरी पोलिस ठाण्यात बोलावले आहे.
“आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, आमच्याकडे भीती बाळगण्यासारखे काहीच नाही. प्रत्यक्षात फ्रीडा डीसा आणि बाबूशनचे अनुयायी हिंसक होते याचे आमच्याकडे सर्व पुरावे आहेत!” ‘आप’चे प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनी त्यांची छायाचित्रे दाखवताना सांगितले.
 “हा हल्ला पोलिसांच्या पूर्ण संरक्षणाखाली करण्यात आला! आम्ही हे जाणून घेण्याची मागणी करतो की, बाबूशनच्या अनुयायांविरूद्ध एवढे पुरावे असतानाही कारवाई का होत नाही ? आपच्या मोहिमेला भाजपाचा कोणताही प्रतिसाद नाही यावरून” कांग्रेसबरोबरची त्यांची युती उघडकीस येते”नाईक म्हणाले.
“आप’ येथे सत्तेसाठी नाही तर गोव्यात व्यवस्था बदलण्यासाठी आहे. आणि प्रशासकीय सत्तेचा गैरवापर करून आपल्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही.” असे आपचे नेते संदेश तेलीकर देसाई म्हणाले. “आम्ही आमच्या नेत्यांसमवेत ठामपणे उभे आहोत. आमचे पक्ष कार्यकर्ते आमच्या नेत्यांशी ठामपणे उभे आहेत आणि कोणीही आम्हाला हलवू शकणार नाही,” असे तेलेकर देसाई यांनी सांगितले.
“या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी आहे की आप कोविड दरम्यान  संपूर्ण गोव्यात रुग्णालयांपासून ते रेशन उपलब्ध करुन देण्यास मदत करणारा एकमेव पक्ष होता. या काळात ते अदृश्य का होते याचा भाजपकडे कोणतेहि उत्तर नाही आणि म्हणूनच ते आम्हाला घाबरवण्याचे प्रयत्न करीत आहेत ”नाईक म्हणाले.

Continue Reading