गोवा खबर : गेले काही दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण गोव्यातील सांगे तालुक्यातील साळावली धरणाचा जलाशय ओसंडून वाहू लागला असून त्याचे उडणारे तुषार धरणाच्या सौंदर्यात भर घालत आहेत. संपूर्ण दक्षिण गोव्याबरोबर उत्तर गोव्यातील काही भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या सांगेतील साळावली धरण महत्वपूर्ण समजले जाते.
पाणी पुरवठ्याबरोबर साळावली धरण जेव्हा भरून ओसंडून त्याच्या खास बनवलेल्या पात्रात वाहु लागते तेव्हा ते पाहण्यासारखे असते.
भरून वहात असलेल्या साळावली जलाशयाचे सौंदर्य डोळे भरून पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक तब्बल नऊ महिने वाट पाहत असतात. गेल्या आणि यावर्षी कोविड कर्फ्यूमुळे स्थानिक आणि पर्यटकांना त्याचा आनंद लुटता आला नाही.