गोवा खबर: हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे मुसळधार पावसात ढगफुटी (cloudburst) झाल्याने धर्मशाला येथील भागसू मध्ये अचानक पुर आला. त्यामुळे वाहनांच आणि घराच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. अनेकांची चारचाकी वाहने देखील पाण्यासोबत वाहून गेली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
हिमाचल प्रदेशातील भागसू हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.ढगफुटी झाल्याने अनेक पर्यटक घटनास्थळी अडकून पडले आहेत. ढगफुटीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या आहेत. ढगफुटी झाली आहे, त्याठिकाणी अरुंद नाला आहे. नाल्याच्या दुतर्फा अनेक हॉटेल्स आहेत. त्यामुळे अनेक हॉटेलमध्ये पाणी शिरून त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण आपत्ती विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पाण्याच्या ओव्हर फ्लोमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.