Connect with us

क्राइम खबर

आपकडून आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर:शनिवारी आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत आपने निषेध केला आहे.
 ‘आप’ने म्हटले आहे की, निवडणुका जवळ येत असतानाच गोव्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असून मुख्यत्वे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच त्यासाठी जबाबदार आहेत.
प्रमोद सावंत एवढे व्यस्त आहेत की,ते गृहमंत्री म्हणून आपल्या खात्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत . त्यांना येत्या निवडणुकांच्या प्रचारात आणि भाजपाने नुकतेच सुरु केलेल्या जनसंपर्क अभियानामध्ये त्यांना अधिक रस आहे,असा आरोप आपने केला आहे.
नारायण नाईक हे सांकवाळ पंचायत इमारतीतून बाहेर पडत असताना दिवसा ढवळ्या त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक बाब आहे की,सरकारी कार्यालयाच्या बाहेरच नागरिकांवर हल्ला करण्याचे धाडस गुंडांमधे आले आहे. गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती इतक्या खालच्या पातळीवर कशी जाऊन पोचली की जिथे दिवसाढवळ्या लोकांवर हल्ले होत आहेत,असा प्रश्न आप ने उपस्थित केला आहे.
गोव्याची कायदा व सुव्यवस्था गेल्या काही काळापासून ढासळत आहे.२३ जून रोजी हार्बर पोलिस स्टेशनला संलग्न असलेल्या एका पोलिसावर वेर्णा पोलिसांनी मुरगाव मधील एका महिलेवर बलात्कार आणि तीची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.त्याच्या दुसर्‍याच दिवशी खंडणीप्रकरणी ताब्यात घेतल्या गेलेल्या कळंगुट पोलिस स्टेशनमधील २ हवलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निलंबित केले. सर्वात वाईट म्हणजे २९ जून रोजी झुआरीनगरमधील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी वेर्णा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केली होती,याकडे आपने लक्ष वेधले आहे.
“गोव्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट पातळीवर गेली आहे. आरटीआयच्या कार्यकर्त्यावर दिवसाढवळ्या हल्ला करण्याचे प्रयत्न करणारे गुंड किती माजले झाले आहेत, याची कल्पना करा!” असे आप राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.
“संपूर्ण जून महिन्यात कायदा व सुव्यवस्थेमधे भयंकर धक्कादायक प्रकरणे पाहायला मिळाली. प्रमोद सावंत आपल्या पुढील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना, त्यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक बिकट होऊ दिली.”असा आरोप म्हांबरे यांनी केला आहे.

Continue Reading