Connect with us

क्राइम खबर

त्यावेळी गोविंद गावडे यांनी मेळावलीच्या जनतेला धोका दिला : शुभम शिवोलकर

Published

on

Spread the love
गोवा खबर: आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे  यांनी निवेदन प्रसिद्ध करत  मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी आयआयटीच्या मुद्दय़ावरून मेळावलीच्या ग्रामस्थांवर नोंदविलेले प्रलंबित खटले मागे घ्यावेत अशी विनंती केली असली तरी मेळावली मधील जनतेला जेव्हा गरज होती तेव्हा गावडे यांनी धोका दिला होता,असा आरोप आप नेते शुभम शिवोलकर यांनी केला आहे.
 विश्लेषणात्मक रसायनशास्त्राच्या बी.एससी मध्ये प्रथम येण्याचा मान मिळालेल्या पीइएस् रवी सीताराम नाईक महाविद्यालय,फोंडा येथील पूजा उमेश मेळेकर हीचा सत्कार करताना मेळावली मधील  ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे   विनंती करणार असल्याचे गावडे म्हणाले होते,त्यावर शिवोलकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आम आदमी पक्षाचे वाळपईचे नेते शुभम शिवोलकर यांनी आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांच्यावर घाणेरडे राजकारण केल्याबद्दल आणि निवडणुका तोंडावर आल्या की जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल टीका केली आहे.
ते म्हणाले की,प्रियोळ मतदारसंघाचे आमदार असलेले गोविंद गावडे यांनी आयआयटीच्या विषयावर मेळावली  ग्रामस्थांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते, नंतर त्यांनी मेळावलीतील जनतेला दिलेल्या आश्वासना वरुन पूर्ण यूटर्न घेतला.
शिवोलकर म्हणाले, पोलीस निरीक्षक एकोसकर यांनी आमच्या माता आणि बहिणीवर हल्ला केला,अश्रुधुरामुळे ग्रामस्थ आणि महिलांना गंभीर समस्या उद्भवली,त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत,तरीही आदिवासी कल्याण मंत्री असलेले मंत्री मेळावलीच्या महिलांवर झालेल्या हल्ल्याबद्दल मौन बाळगून आहेत.या घटनेच्या तब्बल एक वर्षानंतर गोविंद गावडे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न का करीत आहेत, असा सवालही शिवोलकर यांनी केला आणि निवडणुका लवकरच जवळ येत आहेत, त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजकीय फायद्यासाठी खटले मागे घेण्याची विनंती ते करत आहेत,असा आरोप देखील केला.
मेळावली मधील तरुण व ग्रामस्थांवर पोलिसांनी नोंदविलेले सर्व खोटे खटले मागे घ्यावेत यासाठी आप नेते शुभम शिवोलकर यांनी गावडे यांना सुनावले. वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवले गेले होते आणि त्यामुळे तरुणांना त्यांचा संपूर्ण दिवस तिथेच घालवावा लागला होता आणि अनेकदा त्यांना कठीण काळात वेळ देऊन पुढच्या तारखेनुसार भेट द्यावी लागत होती. आपल्या आश्वासनांवर पुढे जाण्यापूर्वी त्यांनी खोटे खटले मागे घेण्याच्या दिशेने कार्य केले पाहिजे, असे शिवोलकर म्हणाले.

Continue Reading