Connect with us

गोवा खबर

सांगेतून नाईक आणि म्हापशातून डिसोझा यांचा शिवसेनेत प्रवेश

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर:सांगेचे समाज सेवक यशवंत केशव नाईक , विक्टर डीकाॅस्ता, आणि म्हापसा येथील उद्योजक रेशाद डिसुझा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
 शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राज्य सरचिटणीस मिलिंद गावस, उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर, दक्षिण जिल्हा प्रमुख आलेक्सी फर्नांडिस, मतदाता सर्वेक्षण समन्वयक झायगल लोबो,शाखा विस्तार समिती प्रमुख राजू विर्डिकर, डिचोली तालुका प्रमुख विश्राम परब, सचिव मंदार पार्सेकर, राजेश पाटील, बाबली नाईक, वंदना चव्हाण आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.
 गोवा शिवसेनेच्या मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या कार्यातून प्रेरीत होऊन मी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड महामारीत चांगले काम करून लोकांचे आशीर्वाद मिळविले आहेत आणि त्या उलट गोवा सरकारने गोंयकारांचे श्राप घेतले आहेत. उध्दव ठाकरे यांच्या कामाने प्रभावित होऊन मी शिवसेना पक्षप्रवेश केला आहे. येत्या निवडणुकीत सांगेत पक्षातर्फे जो उमेदवार दिला जाईल त्याला विजयी करण्याच्या दृष्टीने कार्य करणार असल्याचे यशवंत नाईक यांनी सांगितले.
 भाजप पक्षाने गोव्याची वाट लावली असून  त्यांना सामोरे जाण्याची धमक फक्त शिवसेना पक्षातच आहे आणि म्हणून प्रवेश केला असल्याचे विक्टर यांनी म्हटले आहे. म्हापसा शहरात काहीच विकासकामे झालेली नसून नवीन पक्ष आणि चेहराच म्हापशात बदल घडवून आणू शकतो असे मत म्हापसा स्थित उद्योजक रेशाद डिसुझा यांनी व्यक्त केले आहे.

Continue Reading