देशात याचे संभाव्य अस्तित्व आणि वाढ यावर सातत्याने नजर आणि लक्ष ठेवणे हाच पुढचा मार्ग: सदस्य (आरोग्य) नीती आयोग
गोवा खबर:उत्पपरिवर्तीत डेल्टा प्लस या विषाणूची अद्याप चिंतेची बाब म्हणून वर्गवारी केली नसल्याकडे , नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), डॉ व्ही के पॉल यांनी जनतेचे लक्ष वेधले आहे. कोरोना विषाणूचे नवे रूप समोर आल्याची जनतेतेमध्ये चर्चा सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. विषाणूचे नवे रूप सापडले आहे ही सद्य परिस्थिती आहे.सध्या हा विषाणू व्हेरीयंट ऑफ इंटरेस्ट (VoI) असून व्हेरीयंट ऑफ कन्सर्न (VoC) या चिंतेच्या वर्गवारीत याचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले. व्हेरीयंट ऑफ कन्सर्न म्हणजे वाढते संक्रमण किंवा धोकादायक असल्यामुळे मानवतेवर प्रतिकूल परिणाम करणारा विषाणू प्रकार असे समजले जाते. यासंदर्भात सध्याच्या घडीला तरी डेल्टा प्लस बाबत आपल्याला माहिती नाही असे डॉ पॉल म्हणाले. नवी दिल्लीत पत्रसूचना कार्यालयाच्या राष्ट्रीय मिडिया सेंटर इथे कोविड-19 संदर्भात प्रसार माध्यमांना आधीच्या आठवड्यात माहिती देताना ते बोलत होते.
लक्ष ठेवा,तपास लावा, प्रतिसाद द्या : हा पुढचा मार्ग आहे.
देशात याच्या संभाव्य अस्तित्वाबाबत लक्ष, ठेवून सार्वजनिक आरोग्यासंदर्भात योग्य ती पावले उचलणे हा मार्ग असल्याचे ते म्हणाले. डेल्टा प्लस या बदलाबाबत आपल्याला नजर ठेवण्याची, या प्रकारावर शास्त्रीय पद्धतीने लक्ष ठेवण्याची गरज असून हा आपल्या देशाबाहेर आढळल्याचे ते म्हणाले. आपल्या देशात याचे संभाव्य अस्तित्व आणि वाढ याचा शोध घेण्यासाठी, इंडियन SARS-CoV-2 कॉन्सोर्टीयम ऑन जिनोमिक्स (आयएनएसएसीओजी ) द्वारे यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. विषाणू संदर्भात हा पुढचा मार्ग आहे. आपल्या सुमारे 28 प्रयोगशाळांच्या सर्वसमावेशक प्रणालीच्या भविष्यातल्या कार्यासाठीचा हा महत्वाचा भाग असेल असेही त्यांनी सांगितले. ही प्रणाली यावर सातत्याने लक्ष ठेवेल आणि अभ्यास करेल. विज्ञानाने यावर लक्ष ठेवायला हवे आणि विज्ञान यावर लक्ष ठेवेल आणि जाणून घेईल अशी पुस्ती त्यांनी जोडली.
या विषाणू प्रकाराला दूर ठेवण्यासाठी अचूक शस्त्र नाही.
विषाणूचा हा प्रकार म्हणजे संक्रमणावर नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय आणि यासंदर्भात सुयोग्य वर्तन याचे आपल्याला स्मरण करून देणारा आहे. भविष्यात हे विषाणू उद्भवणार नाहीत याची खातरजमा करण्यासाठी कोणतेही अचूक हत्यार किंवा त्यांना दूर ठेवण्यासाठी मार्ग नाही याचे स्मरण आपल्याला ठेवायला हवे. त्यांच्यावर लक्ष ठेऊन त्याबाबत जाणून योग्य तो प्रतिसाद आणि आपल्यावर त्याचा परिणाम याबाबत सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.योग्य प्रतिसाद म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय आणि कोविडला प्रतिबंध करणारे वर्तन आणि सवयी हेच तत्व आहे.
मूळ कारण जाणून संक्रमणाची साखळी खंडित करण्याचे महत्व त्यांनी विषद केले.विषाणूचा कोणताही नवा प्रकार किंवा नवे रूप याला तोंड देण्यासाठी महत्वाचे साधन म्हणजे कोविडला प्रतिबंध करणारे वर्तन आहे.मूळ कारण म्हणजे संक्रमणाची साखळी.म्हणूनच आपण या मूळ कारणाची दखल घेत संक्रमणाची साखळी खंडित करू शकलो तर विषाणूचा कोणताही प्रकार असला तरी त्याचा प्रसार रोखणे शक्य होईल.
प्रतिकृतीमधील त्रुटीमुळे चिंताजनक रूप निर्माण होऊ शकते.
दुसऱ्या लाटेत डेल्टा B.1.617.2 या उत्परीवर्तनाने आपला प्रभाव दर्शवला, अतिशय लवकर संसर्ग या त्याच्या गुणधर्मामुळे ती लाट तीव्र होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली असे डेल्टा प्लस रूपाची उत्पत्ती विशद करताना ते म्हणले. त्याच धर्तीवर डेल्टा प्लस हे अतिरिक्त उत्परिवर्तन आढळले असून जागतिक डाटा प्रणालीकडे ते सुपूर्द करण्यात आले आहे.याचा डेल्टा प्लस किंवा ‘AY.1’ व्हेरीयंट म्हणून उल्लेख करण्यात येत आहे. मार्चमध्ये हा युरोप मध्ये आढळला आणि त्याची दखल घेण्यात आली आणि केवळ दोन दिवसापूर्वी 13 जूनला त्याविषयी सार्वजनिकरीत्या माहिती दिली गेली..
mRNA विषाणूच्या प्रतिकृतीतल्या बदलांमुळे त्यांच्यातील उत्परिवर्तन अगोदर ओळखता आले याबाबत हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या आरएनए मध्ये प्रतिकृतीत त्रुटी येत्तात तेव्हा विषाणूला काही प्रमाणात नवे वैशिष्ट्य प्राप्त होते. रोगाच्या दृष्टीकोनातून ते अतिशय महत्वाचे असू शकते, जिथून विषाणू शरीराच्या पेशीशी जोडला त्या स्पाईक प्रोटीन सारख्या बाबतीत ते असू शकते.हा भाग जर आधीच्या रूपापेक्षा जास्त प्रभावी असेल तर तो नुकसानकारक ठरतो. म्हणूनच विषाणूच्या या रूपाबाबत आम्ही चिंतीत आहोत असे त्यांनी सांगितले.