Connect with us

गोवा खबर

कॅनन इंडियाने प्रोफेशनल फोटोग्राफर्स, व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठीच्या फोटो प्रिंटर्सची यादी केली व्यापक

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

 

 

  • सादर करत आहेत नवे PIXMA G670, PIXMA G570, imagePROGRAF PRO-300 आणि PIXMA PRO-200, फोटो प्रिंटिंग संस्कृतीला चालना देण्याच्या त्यांच्या उद्देशातील एक पुढचे पाऊल

 

गोवा खबर: तंत्रज्ञान आणि नाविन्यतेचा आपला वारसा जपत कॅनन इंडिया या इनपूट ते आऊटपूट असे सर्व पर्याय पुरवणाऱ्या आघाडीच्या कंपनीने नवे PIXMA G570, PIXMA G670, imagePROGRAF PRO-300 आणि PIXMA PRO-200 सादर करत आपल्या फोटो प्रिंटर्सची उत्पादनयादी अधिक व्यापक केली आहे.

 

फोटो स्टुडिओज, व्यवसाय, घर आणि सर्जनशील कामात उच्च दर्जा, अधिक चांगली फोटो लाँगेटिव्हिटी आणि कमी खर्चातील प्रिंटिंगच्या क्षमता उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने दोन नव्या PIXMA G सीरिज 6-कलर इंक टँक प्रिंटर्सची रचना करण्यात आली आहे. कन्झ्युमर इमेजिंग उत्पादन विश्वातील दशकानुदशकाच्या आधुनिक रंगविज्ञानाच्या ताकदीचा लाभ घेत नव्या G सीरिज फोटो प्रिंटर्समुळे इतकी वैविध्यता आणि संपन्न परिणाम मिळतात जे आजवरच्या इंक टँक प्रिंटर्समध्ये कधीही मिळालेले नाहीत. प्रोफेशनल फोटोग्राफर्स, फोटो स्कुल आणि आधुनिक काळातील हौशी फोटोग्राफर्सना विविध प्रकारच्या कागदांवर अप्रितम इमेजच्या प्रिंट घेणे शक्य करणाऱ्या imagePROGRAF PRO-300 आणि PIXMA PRO-200 या दोन प्रिंटर्समध्ये प्रोफेशनल फोटो आणि प्रदर्शनाच्या पातळीचे A3+ आकारापर्यंतचे प्रिंट्स घेण्यासाठी आवश्यक कॅननचे आधुनिक तंत्रज्ञान आहे.

 

नव्या प्रिंटर्सच्या सादरीकरणाबद्दल कॅनन इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनाबू यामाजाकी म्हणाले, “जागतिक महासंकटाचे सावट अजूनही देशावर आहे. जवळपास प्रत्येकजणच दूरस्थ पद्धतीने काम करत असताना त्यांचा कामाचा अनुभव अधिक वृद्धिंगत करतील असे पर्याय उपलब्ध करून देण्यास कॅनन इंडिया बांधिल आहे. एक परिपूर्ण पर्याय प्रदाता म्हणून अगदी जीवंत वाटावेत असे क्षण पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आमच्या इमेजिंग तंत्रज्ञानाचा आणि त्या खास, सुंदर क्षणांना बहुरंगी, फ्रेम करण्यायोग्य फोटोंमध्ये बदलण्यासाठीच्या आमच्या प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा आम्हाला अभिमान आहे. स्मार्ट प्रिंटिंग पर्यायांसह ग्राहकांना आनंद देण्याच्या आमच्या प्रवासातील सातत्य म्हणून आमच्या नव्या प्रिंटर्सच्या सादरीकरणामुळे आमच्या फोटो प्रिंटर्सच्या पोर्टफोलिओला अधिक बळकटी मिळणार आहे. आम्हाला आशा आहे की आमचे हे चार नवे प्रिंटर्स अत्यंत नाविन्यपूर्ण, योग्य दरातील आणि उत्पादक पर्यायांनी आमच्या ग्राहकांच्या प्रिंटिंग गरजांसाठी समृद्ध अनुभव निर्माण करतील.

 

या नव्या उत्पादनांबद्दल कन्झ्युमर सिस्टम प्रोडक्ट्स अॅण्ड इमेजिंग कम्युनिकेशन प्रोडक्ट्सचे संचालक श्री. सी सुकुमारन म्हणाले, “एक ख्यातनाम इमेजिंग कंपनी म्हणून कॅननमध्ये आम्ही आमच्या उत्पादन आणि पर्यायांच्या माध्यमातून आमच्या वापरकर्त्यांमध्ये फोटो प्रिंटिंगच्या संस्कृतीला चालना देण्यावर विश्वास ठेवतो. रंग भावविश्वाच्या अत्युच्च्य दर्जासह आयुष्यभर जपून ठेवता येतील अशा सुंदर आठवणी प्रिंट करण्यात आमच्या ग्राहकांना साह्य करणे हा आमचा उद्देश आहे. वापरकर्त्यांना स्मार्ट प्रिंटिंग पर्याय देऊन त्यांच्या उत्क्रांत होणाऱ्या फोटो प्रिंटिंग गरजा भागवण्यासाठी खास या फोटो प्रिंटर्सची रचना करण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त वापरकर्तास्नेही वैशिष्ट्ये आणि नव्या स्वरुपातील डिझाइनमुळे या नव्या प्रिंटर्समध्ये वरच्या दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य दर यांचा योग्य मेळ साधत अंतिम ग्राहकाला सुयोग्य सेवा दिली जात आहे.

 

PIXMA G670 आणि PIXMA G570

 

इतर सर्व G series प्रिंटर्सप्रमाणेच नवे मॉडेल्सही कमी दरात फारच चांगले उत्पादन देतात. प्रिंटरहित इंकच्या संपूर्ण सेटमध्ये 4×6” च्या सुमारे 3,800 प्रिंट मिळतात. त्यामुळे प्रिंटिंगच्या खर्चाचा विचार न करता निश्चिंतपणे प्रिंट घेता येतात. पारंपरिक प्रिंटर्सच्या तुलनेत G570 आणि G670 ची देखभाल अगदी सहज आहेच पण त्याचबरोबर उच्च प्रमाणातील प्रिंट्सची मागणी पूर्ण व्हावी या उद्देशाने त्यांची रचना करण्यात आली आहे. एरवी प्रिंटरमधील भाग बदलण्यासाठी ग्राहकांना सर्विस सेंटरला जावे लागते. मात्र, यातील बदलण्यायोग्य घटकांसोबत मॉड्युलर स्ट्रक्चरमुळे ग्राहकांना बराच काळाच्या वापरानंतर स्वत:च हे भाग बदलता येतात.

 

नव्या G Series मध्ये 6 कलर ऑल डाय इंक टँक सिस्टम आहे. सियान, मजेंटा, यलो आणि ब्लॅकसह या प्रिंटर्समध्ये नवी रेड आणि ग्रे इंकही आहे. नव्या रेड इंकमुळे रक्तचंदनी सूर्यास्तापासून लाल रंगात चमकणारे ऑटोमोबाइल्स असे असंख्य फोटो अधिक सुंदर दिसतात. ग्रे इंकमुळे अनेक प्रिंट्सनंतरही सातत्यपूर्ण मोनोक्रोमॅटिक अचूकता कायम राहते. यातील ब्लॅक इंकमुळे काँण्ट्रास्ट मिळून फोटोतील मूळ भाग अधिक सुस्पष्ट आणि पार्श्वभूमीहून ठळक दिसतो.

 

आठवणी धुसर होत जातात. मात्र, नव्या इंक सिस्टम आणि कॅनन फोटो पेपर्समुळे अप्रतिम अशा टिकाऊ प्रिंट्स मिळतात. ज्यामुळे, नीट जपून ठेवले तर हे फोटो 100 वर्षांपर्यंत धुसर होणार नाहीत. G570मध्ये फक्त प्रिंटिंग आहे. पण आता G670 मध्ये प्रिंटिंगसोबतच स्कॅन आणि कॉपीचीही सुविधा आहे.

 

एकात्मिक डिझाइन, सहज देखभाल

नो स्क्विझ स्पीलेज फ्री म्हणजे न सांडणारी, दाबावी न लागणारी अशी इंक बॉटल रचना असल्याने सेटअपच्या वेळी आवश्यक प्रमाणातच इंक बाहेर पडते आणि तेवढ्याच मात्रेचा वापर होतो. त्यामुळे शाई सांडणे, पसरणे असे त्रास होत नाहीत. पर्यावरणदृष्ट्या सजग राहत यातील अनोख्या पॉवर-सेव्हिंग वैशिष्ट्यामुळे काम नसताना प्रिंटर आपोआप बंद होतो. शिवाय, स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमधून प्रिंटची सूचना मिळाल्याबरोबर हा प्रिंटर स्लीप मोडमधून आपोआप सुरूही होतो.

 

स्मार्टफोन आणि स्मार्ट होम कनेक्टिव्हिटीमधून वायरलेस प्रिंटिंग

कॅनन प्रिंट इंकजेट/SELPHY मोबाइल अॅपमुळे वापरकर्त्यांना मोबाइल डिव्हाइसवरून थेट प्रिंट काढता येते किंवा स्कॅन करता येते तसेच प्रिंटरच्या सेंटिंग्स नियोजित करता येतात आणि डिव्हाइस अलर्टही मिळवता येतात. PIXMA क्लाऊड लिंक सर्विसमुळे ग्राहकांना रीमोट प्रिंटिंग आणि स्कॅनिंगसाठी त्यांचे प्रिंटर्स सोशल नेटवर्क्सला आणि क्लाऊड स्टोरेजला जोडता येतात.

 

इतकेच नाही, मोफत कॅनन PosterArtist Lite मुळे प्रोफेशनल्स आणि घरगुती वापरकर्त्यांना 1300 टेम्पलेट्स, फोटोज आणि क्लिपआर्टच्या व्यापक यादीतून निवड करत अगदी सहजपणे सुंदर फ्लायर्स आणि पोस्टर्स बनवता येतात. PosterArtist Lite सॉफ्टवेअर फक्त विंडोंज ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध आहे.

 

हँड्स-फ्री अनुभवासाठी या नेक्स्ट-जनरेशन प्रिंटर्सना स्मार्ट स्पीकर्सच्या साह्यानेही वापरता येते. तसेच व्हॉईस-अॅक्टिव्हेटेड प्रिंटिंगसाठी गुगल असिस्टंट आणि अॅमेझॉनलाही ते समर्थित आहेत. यामुळे वापरकर्त्यांना परिणामकारकपणे मल्टिटास्किंग करता येते आणि रंगीत पाने, ओरिगामी, कार्ड्स किंवा खरेदीची यादी अशी कोणतीही कागदपत्रे निव्वळ व्हॉईस कमांडने प्रिंट करता येतात.

 

कॅनन imagePROGRAF PRO-300 आणि कॅनन PIXMA PRO-200

 

कॅनन imagePROGRAF PRO-300 मध्ये LUCIA PRO पिगमेंट इंक सिस्टम आणि क्रिस्टल-फिडेलिटी डिजिटल इमेज प्रोसेसिंग वर्कफ्लो आहे. त्यामुळे इमेज मिळवण्यापासून प्रिंट करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर फोटोतील उत्कृष्टता जपली जाईल याची खातरजमा होतो. त्यामुळे हा प्रिंटर प्रोफेशनल फोटोग्राफर्ससाठी एक सुयोग्य साथीदार ठरतो. हा प्रिंटर कॅननच्या L-COA प्रोसेसवर तयार करण्यात आल्याने इमेजचा मोठा डेटा सहज हाताळला जातो आणि वेगाने कमाल शाईचे प्रमाण जोखले जाऊन प्रिंटिंगमध्ये उच्च दर्जा आणि अधिक वेग राखला जातो. ऑप्टिमम इमेज जनरेटिंग (ओआयजी) सिस्टममुळे प्रिंटचा प्रत्येक भाग तपासला जातो आणि शाईचा योग्य मेळ साधून प्रिंटमध्ये उत्कृष्ट दर्जा राखला जाईल याची खातरजमा केली जाते.

 

कॅनन PIXMA PRO-200 मध्ये अनोख्या 8-कलर डाय इंक सिस्टमसह उच्च दर्जाचे प्रिंटिंग मिळते. यातील रंगांच्या बहुविधतेमुळे उत्कृष्ट कॉण्ट्रास्ट आणि अधिक चांगल्या काळ्या शाईसह लाल आणि निळ्या रंगछंटांमध्येही उत्कृष्ट छपाई मिळते. या प्रिंटरमधील ऑप्टिमम इमेज जनरेटिंग (ओआयजी) सिस्टममुळे प्रिंटमधील प्रत्येक भाग तपासला जातो आणि शाईचा योग्य मेळ साधून प्रिंटमध्ये उत्कृष्ट दर्जा राखला जाईल याची खातरजमा केली जाते.

 

A3+ आकारापर्यंतच्या मॅट कागदाबरोबरच सेमी-ग्लॉस, सुपर हाय ग्लॉस ते फाइन आर्ट ग्रेड कागद हाताळण्याची क्षमता असलेल्या या दोन्ही प्रिंटर्समध्ये सरळ पाथ फिडिंगसाठी मॅन्युअल फीड ट्रे देण्यात आला आहे. यात पॅनारोमिक फोटोज आणि कस्टम बॉर्डर मार्जिन्ससह प्रिंट घेता येतात. त्याचप्रमाणे, या प्रिंटर्समध्ये कॅनन प्रोफेशनल प्रिंट अॅण्ड लेआऊट सॉफ्टवेअरमुळे सहजपणे वर्कफ्लो इंटिग्रेशन साधता येते. त्यामुळे विशिष्ट कंट्रोल आणि सॉफ्ट-प्रूफिंगसाठी प्रोफेशनल स्क्रीन-टू-प्रिंट वर्कफ्लो मिळतो. कमाल प्रिंटसाठी वापरकर्त्यांना ड्राइव्हर आणि प्रिंटर अशा दोन्ही ठिकाणी मीडिया कस्टमाइज करता येत असल्याने या प्रिंटर्समध्ये मीडिया कन्फिगरेशनला चालना मिळते आणि त्यामुळे कॅनन आणि तृतीय पक्ष मीडियासाठी मीडिया हाताळणे अधिक सहजसोपे होते.

 

1 किंमत आणि उपलब्धता

Model Number MRP Availability
PIXMA G670 24,801/- June 2021
PIXMA G570 18,789/- June 2021
PIXMA PRO-200 41,401/- June 2021
imagePROGRAF PRO-300 59,621/- June 2021

 

1 या किमती अंदाजे रीटेल किमती आहेत आणि कोणत्याही सूचनेशिवाय कधीही त्या बदलल्या जाऊ शकतात.

 

PIXMA इंक एफिशिएन्ट G670

अधिक प्रमाणातील फोटो प्रिंटिंगसाठी परत भरता येणारे इंक टँक

Product Dimensions (W x D x H) Approx. 445 x 340 x 167 mm
Photo ISO Print Speed Approx. 47 sec
Key Features ·       Print, Scan, Copy

·       Print up to 3,800 prints (4 x 6”)

·       Load up to 30 sheets of photo paper

·     Borderless photo printing up to A4 size

·       Supports wireless and mobile printing

 

 

PIXMA इंक एफिशिएन्ट G570

अधिक प्रमाणातील फोटो प्रिंटिंगसाठी परत भरता येणारे इंक टँक

Product Dimensions (W x D x H) Approx. 445 x 340 x 136 mm
Photo ISO Print Speed Approx. 47 sec
Key Features ·         Print

·         Print up to 3,800 prints (4 x 6”)

·         Load up to 30 sheets of photo paper

·         Borderless photo printing up to A4 size

·         Supports wireless and mobile printing

 

 

PIXMA इंक एफिशिएन्ट PIXMA PRO-200

हौशी आणि उदयोन्मुख फोटोग्राफर्ससाठी परत भरता येणारे इंक टँक

Product Dimensions (W x D x H) Approx. 639 x 379 x 200 mm
Photo ISO Print Speed 11 x 14” image on A3+ with Border Colour, PT-101 1 min 30 s
Mono, PT-10 1 min 30 s
4 x 6” Borderless Colour, PT-101 35s
Key Features • 8 Ink System, All Dye, 4800×1200 dpi print resolution
• High Quality with Optimum Image Generating System
• Compact prints upto A3+, 3″ color LCD, USB, Ethernet, WIFI, 3 way paper feed
• Inbuild Media Configuration tools

 

 

कॅनन imagePROGRAF PRO-300

प्रोफेशनल आणि एक्झिबिशन-रेडी फोटोसाठी परत भरता येणारे इंक टँक

Product Dimensions (W x D x H) Approx. 639 x 379 x 200 mm
Photo ISO Print Speed 11 x 14” image on
A3+ with Border
Colour/Mono, PT-101 4 min 15 s
A4/8 x 10” image
on A4 with Border
Colour, PT-101 2 min 30 s
4 x 6” Borderless Colour, PT-101 1 min 45 s
Key Features • 10 Ink System, All Pigment, 4800×1200 dpi print resolution
• High Quality with Optimum Image Generating System
• Compact prints upto A3+, 3″ color LCD, USB, Ethernet, WIFI, 3 way paper feed
• Inbuild Media Configuration tools

 

Continue Reading