Connect with us

क्राइम खबर

गतीवान विभागात पुरुषांमध्ये विनायक गांवकर तर महिलांमध्ये डॉ ब्लाँच थेमुडो प्रथम

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : फोंडा येथील स्लोप्स अँड बेंड्सतर्फे रविवार १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली ‘पेज्जाद ६७’ सायकल राईड १७४ सायकलस्वारांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. यामध्ये १६६ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे.
या राईडमध्ये गोवा, सावंतवाडी आणि बंगळुरू येथील सायकलस्वार सहभागी झाले होते. या अनोख्या सायकल राईडमध्ये सायकलस्वारांनी ६७ किलोमीटरचे अंतर सहा तासात पूर्ण केले. तसेच त्यांनी सुमारे समुद्रसपाटीपासून १००० मीटरची उंचीही गाठली.
या राईडमध्ये फार्मागुडी, सावईवेरे, ओपा खांडेपार, निरंकाल, कोणशे, शिरोडा आणि तळावली या मार्गावरील खडतर टेकड्यांचा समावेश होता.
गतीवान विभागात पुरुषांमध्ये वास्को येथील अभियंते विनायक गांवकर तर महिलांमध्ये नावेली येथील दंततज्ञ डॉ ब्लाँच थेमुडो यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
याविषयी बोलताना आयर्नमॅन ट्राय ऍथलीट पूर्ण केलेले विनायक गांवकर म्हणाले की मी फोंडा भागातील निसर्ग सौन्दर्य, येथील खडे चढ उतार यांचा कधीच अनुभव घेतला नव्हता.”
तर अनुभवी मॅरेथॉनपटू डॉ ब्लाँच थेमुडो म्हणाल्या की ” फोंडा येथील खडया चढ उतारावर सायकलिंग करणे आव्हानात्मक होते.”
ही राईड फोंडा येथील गीव्हीएम उच्च माध्यमिक विद्यालय येथून सकाळी ६.३० वाजता सुरू झाली.गोव्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाई यांनी या राईडचा शुभारंभ केला.
राईडमध्ये करमोणा येथील अनुप बाबानी (वय ६८) हे सर्वात वरिष्ठ तर बांदोडा येथील व्हिन्सेंट फर्नांडिस (वय १२) हे सर्वात लहान सायकलपटू ठरले.
याविषयी बोलताना स्लोप्स अँड बेंड्स क्लबचे अध्यक्ष अजय डोंगरे म्हणाले की फोंडयाच्या रस्त्यावरील महत्त्वाच्या ठिकाणी सायकलस्वारांना मदत करण्यासाठी  आमचे प्रतिनिधी नेमण्यात आले होते. तसेच वैद्यकीय आपदकाळासाठी मणिपाल इस्पितळाची ऍम्ब्युलन्सही ठेवण्यात आली होती. राईड पूर्ण करणाऱ्या सर्व सायकलस्वारांना चषक देण्यात आले.”
विभाग निहाय निकाल खालीलप्रमाणे :
पुरुष विभाग
विनायक गांवकर – प्रथम
प्रदीप कोल्हापते – द्वितीय
परशुराम कोळी, जोनाह कुतीन्हो-विभागून तृतीय
महिला विभाग
डॉ ब्लाँच थेमुडा – प्रथम
पूजा जवाहर – द्वितीय
अक्षता अलोरणेकर – तृतीय

Continue Reading