Connect with us

जनमत

गौरी लंकेश हत्येप्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना सॉफ्ट टार्गेट बनवून गोवण्याचे षड्यंत्र !

Published

on

Spread the love
 

फोंडा (गोवा– वामपंथीय विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेतया हत्येप्रकरणी गौरी लंकेश यांचे सख्खे भाऊ इंद्रजीत हे सातत्याने गौरी लंकेश यांच्या हत्येला कर्नाटकातील तत्कालीन काँग्रेसचे सिद्धरामय्या सरकार उत्तरदायी आहेअसे जाहीरपणे सांगत आहेतगौरी लंकेश यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध आणि काँग्रेस सरकारच्या काळात लयाला गेलेली कायदा सुव्यवस्थेची स्थितीहे त्यांच्या हत्येस कारणीभूत आहेतअसे त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांनाही सांगितले आहेनिवडणुकीला काही काळ असतांना सिद्धरामय्या सरकारला गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणी कुठलेही धागेदोरे सापडत नसतांना अचानक हिंदु युवा सेनेचे प्रमुख के.टीनवीनकुमार यांना आणि त्यांच्या ३ कार्यकर्त्यांना शस्त्रविक्री करण्याच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आलीकाही दिवसांनी त्या ३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले.त्यानंतर या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांकडे जाऊन के.टीनवीनकुमार यांचा या हत्येशी कुठलाही संबंध नसून पोलिसांनी मारहाण करून आमच्याकडून बळजोरीने हे सर्व लिहून घेतलेअसे सांगितलेदुर्दैवाने आमच्याकडील निधर्मी पत्रकारांनी या महत्त्वाच्या घटनेला कुठलीही प्रसिद्धी दिली नाही.

         यानंतर कर्नाटकातील निवडणुका घोषित झाल्यात्यानंतर विशेष तपास पथकाकडून होणारा तपास थंडावलाकर्नाटकातील निवडणुका पार पडल्या आणि भाजप बहुमत मिळूनही सत्तेत येऊ शकणार नाहीहे स्पष्ट झालेभाजपच्या अल्पकालीन मुख्यमंत्र्यांना त्यागपत्र द्यावे लागलेत्या वेळी पुन्हा काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्षया निधर्मी पक्षांचे सरकार सत्तेवर येणारहे स्पष्ट झालेत्यानंतर त्वरित विशेष तपास पथक सक्रीय झाले आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याशी काही वर्षांपूर्वी संबंधित असणार्‍या कार्यकर्त्यांना के.एस्भगवान या धर्मद्रोही लेखकाची हत्या करण्याचा कट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीम्हणजे हत्येची काल्पनिक कथा रचून त्यांना या प्रकरणी गोवण्यात आलेआता त्यांना गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केल्याचे पोलीस सांगत आहेतया हत्येचा आरोप करतांना हत्येशी संबंधित कुठलाही प्रत्यक्ष पुरावा आजवर सादर करण्यात आलेला नाहीया ठिकाणी विशेष तपास पथक हे जणूकाही सत्तेवर येणार्‍या सरकारच्या विचारसरणीप्रमाणे तपास करत आहेअसा संशय घेण्यास जागा आहेहिंदुत्वाचे कार्य करणार्‍या 23 हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची याच कर्नाटक राज्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आलीमात्र एकाही प्रकरणात अशाप्रकारे अन्वेषण करण्यात आले नाहीया हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्येच्या प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक होऊनही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला कोणीही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत नाहीमात्र सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना सॉफ्ट टार्गेट बनवून चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जात आहेसेक्युलरवादाच्या नावाखाली हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते यांना संपवण्याचे हे षड्यंत्र आहे.

 चेतन राजहंस, 
  राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

Continue Reading