Connect with us

जनमत

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने पशु-पक्षी आध्यात्मिक स्पंदने जाणू शकतात, तर मनुष्य का नाही ?, या विषयावर शोधनिबंध सादर

Published

on

Spread the love
मेक्सिको येथे धर्ममीमांसा आणि पंथ यांतील प्राण्यांचे स्थान विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद
 
मेक्सिको – १७ ते २४  २०१८ या काळात धर्ममीमांसा आणि पंथ यांतील प्राण्यांचे स्थान (अनिमल्स इन थिओलॉजी अ‍ॅण्ड रिलीजन) या विषयावर माइंडींग अ‍ॅनिमल्स इंटरनॅशनल इनकॉरपोरेटेड या संघटनेने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत २२ जानेवारी २०१८ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने पशु-पक्षी आध्यात्मिक स्पंदने जाणू शकतात, तर मनुष्य का नाही ? (इफ अ‍ॅनिमल्स कॅन परसिव्ह स्पिरिच्युअल व्हायब्रेशन्स, वाय कान्ट ह्यूमन्स ?) या विषयावर महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि सहलेखक डॉ. मुकुल गाडगीळ यांनी लिहिलेला शोधनिबंध उत्तर अमेरिकी देश मेक्सिको येथील कु. मारीआला यांनी सादर केला.
वर्ष २००४ मध्ये त्सुनामी येण्यापूर्वी काही घंटे आधी पशु-पक्ष्यांनी समुद्रसपाटीपेक्षा अधिक उंचीच्या भागात आश्रय घेतला होता. या नैसर्गिक आपत्तीत १४ देशांतील साधारण २ लक्षांहून अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या; पण त्या तुलनेत पशु-पक्षी यांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. यातून पशु-पक्ष्यांमध्ये अशी कोणती क्षमता आहे, ज्यामुळे जे मनुष्याला कळू शकले नाही, ते त्यांना जाणता आले ? त्यांच्यात निसर्गातील बदलांसंदर्भात असलेल्या सजगतेमुळे कि सूक्ष्मातील जाणण्याच्या क्षमतेमुळे कि दोन्हींमुळे त्यांना हे जाणता आले ?, असे प्रश्‍न निर्माण होतात. यांसारख्या काही घटनांमुळे पशु-पक्ष्यांमधील आध्यात्मिक स्पंदने जाणण्याच्या क्षमतेविषयी संशोधन करण्याची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला प्रेरणा मिळाली आणि विविध प्रयोगांच्या माध्यमातून हे संशोधन करण्यात आले. यामध्ये सत्त्वगुणप्रधान पशु-पक्षी हे सात्त्विक, तर रज-तमगुणप्रधान पशु-पक्षी हे असात्त्विक गोष्टींची (उदा. संगीत, खाद्यपदार्थ, वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांची) निवड करतात, असे लक्षात आले. तसेच रज-तमगुणप्रधान पशू-पक्ष्यांना सात्त्विक वातावरणात आणि सत्त्वगुणप्रधान पशू-पक्ष्यांना असात्त्विक वातावरणात जास्त काळ रहाता येत नाही, असेही लक्षात आले. हे संशोधन कुत्रा, गाय, घोडा, ससा, कोंबडा, पोपट आदी पाळीव पशु-पक्षी यांच्या संदर्भात करण्यात आले. हे संशोधन करतांना केलेल्या विविध प्रयोगांचे वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओजही सदर परिषदेत विषय मांडतांना मारिआला यांनी दाखवले. यासंदर्भात अभ्यासाअंती काढण्यात आलेले वैशिष्ट्यपूर्ण निष्कर्षही या वेळी त्यांनी  मांडले. पशु-पक्ष्यांप्रमाणेच मनुष्यामध्येही सूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता उपजतच असते, पण त्याने व्यावहारिक गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने ती क्षमता गमावली आहे. सूक्ष्मातील जाणण्याची ही क्षमता नियमित उपासना केल्यास मनुष्य पुन्हा प्राप्त करू शकतो आणि त्यामुळे त्याला त्याच्या भोवतालचे जग व्यापक दृष्टीकोनातून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल, असे शोधनिबंध सादर करतांना कु. मारीआला यांनी शेवटी सांगितले. शोधनिबंध सादर करणार्‍या कु. मारीआला या विदेशी असल्या, तरी भारतीय संस्कृतीचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व पटल्याने त्यांनी मेक्सिको येथे शोधनिबंध सादर करतांना भारतीय संस्कृतीनुसार साडी परिधान केली होती.
 श्री. रूपेश रेडकर,
       संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय
   संपर्क : 9561574972

Continue Reading