गोवा खबर

स्वतःला संविधानाप्रती समर्पित करूया : खवंटे

Published

on

Spread the love

गोवा खबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानातील योगदानाचे स्मरण करून म्हापसा येथील प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात राष्ट्रीय तिरंगी फडकविला आणि भारतीय राज्यघटनेसाठी स्वतःला समर्पित करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी सांगितले.

खवंटे यांनी  भारताच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगतीच्या मार्गावर जात असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या गतिमान नेतृत्वाखाली गोवा प्रगती करीत आहे असे सांगितले.

गोवा हे केवळ एक राज्य नसून कला, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्याने भरलेला खजिना आहे असे सांगून मंत्र्यांनी गोमंतकीय आदरातिथ्य करणारे, संघटित आणि मेहनती आहेत आणि हेच गोव्याच्या राज्यघटनेच्या प्रगतीचे बलस्थान आहे असे ते म्हणाले.

विकसित भारत २०४७ चे उद्दीष्ट युवक, महिला, शेतकरी आणि गरीब या चार स्तंभांना कल्याणकारी उपाययोजनांद्वारे चालना देण्यावर आधारित आहे असे त्यांनी सांगितले. पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असल्याने पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या क्षेत्रातील महिला व तरुणांना रोजगार देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत असे ते म्हणाले.

सरकार गोव्यातील पारंपारिक सणांना प्रोत्साहन देत आहे, मंदिरांचे ‘तीर्थ सर्किट’ विकसित केले आहे आणि फर्मागुडी, फोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय बांधण्याचे काम करीत आहे असे ते म्हणाले. सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेषांच्या नुकत्याच संपन्न झालेल्या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाबद्दलही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले गेल्या दोन-तीन वर्षांत पर्यटकांची संख्या वाढली आहे. मध्यपूर्वेतील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गोव्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काम करीत असून त्याचे फायदे नजीकच्या भविष्यात पाहायला मिळतील अशी माहिती त्यांनी दिली.

 खवंटे यांनी गोवा सरकारने ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल सेवेमध्ये प्रगती केली असून गोमंतकीयांसाठी ही प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक झाली आहे. ते म्हणाले की गोवा एक आयटी हब बनत आहे, ज्यासाठी डिझाइन व्हिलेज, स्टार्ट-अप्स, इनक्यूबेटर सुविधा इत्यादींमध्ये मदत करण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. मोफत वायफाय स्पॉट्स सुरू करण्यासोबतच सरकार लवकरच हॉट स्पॉट्सही देणार आहे असे ते म्हणाले.

सरकारला कल्याणकारी पावले उचलायची आहेत त्यासाठी जनतेचा विश्वास आणि पाठबळ आवश्यक आहे असे सांगून श्री. खवंटे यांनी सरकार त्यांच्यासाठी काय करू शकते हे विचारण्याऐवजी त्यांनी आत्मपरीक्षण करून सरकारसाठी काय करू शकते हे विचारले पाहिजे असे ते म्हणाले.

 यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उप जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेंकर, उपजिल्हाधिकारी, म्हापसा, वर्षा परब, उपजिल्हाधिकारी- २ पांडुरंग गाड, मामलेदार, बरडेज, अनंत मलिक आदी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version