गोवा खबर

प्रजासत्ताक दिन विविधतेत एकता दर्शविते : सिक्वेरा

Published

on

Spread the love

गोवा खबर : प्रजासत्ताक दिन देशाच्या विविधतेत एकता दर्शवितो. देशातील लोक जात आणि धर्माचा विचार न करता भारतीय संविधान स्वीकारल्याचा आनंद साजरा करतात असे पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, मडगाव येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय तिरंगा फडकविल्यानंतर ते बोलत होते.

सिक्वेरा यांनी लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना प्रजासत्ताक दिन हा प्रजासत्ताक दिवस ‘सुवर्ण भारत, वारसा आणि प्रगती’ या संकल्पनेवर साजरा केला जातो असे सांगितले. देशासाठी संविधानाचा स्वीकारून आमचा देश सार्वभौमत्व राष्ट्र झाल्याची आठवण म्हणून साजरा करतो. संविधानाने देशाच्या नागरिकांना स्वातंत्र्य, समानता, न्याय, आणि बंधुत्वाच्या अधिकाराची खात्री दिली आहे असे सांगितले.

सिक्वेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे आणि नेतृत्वाचे कौतुक केले. डबल इंजिन सरकारमुळे गोवा राज्यातील मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे विद्यार्थी समाजाच्या विकासासाठी अथक प्रयत्न करीत असल्याची माहितीही सिक्वेरा यांनी दिली. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नेते असतील असेही ते म्हणाले.

सुरवातीस आलेक्स सिक्वेरा यांनी पोलीस, होमगार्ड आणि विद्यार्थ्यांच्या संचलनाची पाहणी केली. कार्यक्रमानंतर पोलीस, होमगार्ड, जीएचआरडीसी, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांच्या पथकाने मार्च पास्ट सादर केली. यावेळी सांस्कृतिक नृत्य व देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.

मार्च पास्टमध्ये जवाहर नवोदय विद्यालय, काणकोणने प्रथम क्रमांक पटकावला. व्दितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे नूतन महिला हायस्कूल, मडगाव आणि सेंट तेरेझा हायस्कूलने पटकाविले. रवींद्र केळेकर ज्ञानमंदिर, मडगावच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांमध्ये प्रथम पारितोषिक पटकाविले. रोझरी इंग्लिश हायस्कूल आणि न्यू इरा हायस्कूलने अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. सांस्कृतिक कार्यक्रमात कार्मेल हायस्कूलने प्रथम, दामोदर हायस्कूलने व्दितीय तर सेंट जोसेफ हायस्कूलने तृतीय पारितोषिक पटकावले. सम्राट क्लब ऑफ मडगावतर्फे पारितोषिके पुरस्कृत केली होती.

नावेलीचे आमदार उल्हास तुयेंकर, जिल्हाधिकारी दक्षिण एग्ना क्लीटस, आयएएस, पोलीस अधिक्षक सुनिता सावंत आदी वरिष्ठ अधिकारी व स्वातंत्र्यसैनिक यावेळी उपस्थित होते. अनिल पै यांनी सूत्रसंचालन केले.

Trending

Exit mobile version