गोवा खबर : राष्ट्रीय मतदार दिन हा आपल्या चैतन्यशील लोकशाहीचा गौरव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा उत्सव आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे, राष्ट्रीय मतदार दिन हा आपल्या चैतन्यशील लोकशाहीचा गौरव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा उत्सव आहे. आजचा दिवस देशाचे भविष्य घडवण्यात सर्वांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करतो. या संदर्भात निवडणूक आयोगाने केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.