गोवा खबर : मिनेझिस ब्रागांझा संस्थेने ज्येष्ठ लेखक, कवी आणि आगामी लेखक, कवी यांना संस्थेतर्फे लवकरच प्रकाशित केल्या जाणाऱ्या पुस्तिकेत समाविष्ट करण्यासाठी तपशील सादर करण्याची विनंती केली आहे.
मिनेझिस ब्रागांझा संस्था कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत लिहिणाऱ्या गोव्यातील लेखक, कवी, साहित्यिक यांची माहिती आणि दस्तऐवज एक पुस्तिका किंवा निर्देशिकेच्या स्वरूपात एकत्र करणार आहे. या पुस्तिकामध्ये लेखक आणि कवींची त्यांच्या संबंधित भाषेतील नावे तसेच लेखकाचे किंवा कवीचे नाव, पत्ता, भाषा, फोन नंबर आणि त्यांचे प्रकाशन तपशील यासारखी अतिरिक्त माहिती समाविष्ट असेल.
गोव्यातील लेखकांची विविध भाषांमध्ये माहिती एकाच ठिकाणी मिळाल्याने मिनेझिस ब्रागांझा संस्थे च्या या उपक्रमामुळे लेखक, कवी, सांस्कृतिक संस्था, सरकारी एजन्सी आणि सामान्य जनतेला मदत होईल. या माहितीचा एक भाग डिजिटल वापरकर्त्याच्या माहितीसाठी संस्थेच्या वेबसाइटवरही अपलोड केली जाईल.
आवश्यक तपशील लिखित स्वरूपात (हार्ड कॉपी) किंवा (सॉफ्ट कॉपी) व्दारे सदस्य सचिव, मिनेझिस ब्रागांझा, संस्था पणजी यांना १५ मार्च २०२५ पूर्वी सादर करावे. व्हॉट्सॲप क्रमांक: ९४०४१६५१४२, ईमेल: imbpanaji@yahoo.com , वेबसाइट: https:// www.imbgoa.com .