गोवा खबर

कृष्णा पालयेकर २५ रोजी गोवा दूरदर्शनवर 

Published

on

Spread the love
गोवा खबर : गोवा दूरदर्शनवर पेडणे येथील नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पालयेकर यांची मुलाखत २५ जानेवारी रोजी संध्या. ७ वा. प्रक्षेपित होईल. ही मुलाखत लेखिका निमा आमोणकर यांनी घेतलेली आहे. दूरदर्शनच्या निर्मात्या चंपा पणजीकर यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. 
या मुलाखतीत बालपण आणि शिक्षणाबद्दल माहिती, शालेय जीवनातलं व्यक्तिमत्व, राष्ट्रीय युवा संसद मध्ये गोवा राज्याचे केलेले प्रतिनिधित्व, नवचेतना युवक संघाची स्थापना, कोविड काळातलं नवचेतना युवक संघाचं काम, पर्यटनातलं वेगळेपण, प्रेरणास्थान, विधवा बायकांच्या पुनर्वसनासंबंधित जनजागृती, वक्ता सूत्रसंचालक म्हणून घडण्यासाठीचे प्रयत्न, गोवा विद्यापीठात मिळविलेले यश, मूर्तिकार म्हणून अनुभव, गोवा मुक्ती संग्रामावरील मुक्ती गीता संबंधी, त्यांनी सुरू केलेल्या मोहिमी याविषयी या मुलाखतीत माहिती मिळणार आहे.

Trending

Exit mobile version