गोवा खबर

राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 26 जानेवारी रोजी सकाळी 8.15 वाजता ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठाच्या मैदानावर हॅलीपॅड भागात कार्यक्रम होणार आहे.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यावेळी राष्ट्रीय तिरंगा फडकवून मानवंदना देणार आहेत. त्यानंतर त्यांचे भाषण होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी राज्यपालांचे आगमन झाल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, आयएएस, पोलीस महासंचालक अलोक कुमार, आयपीएस, गोवा विभागाचे ध्वजाधिकारी त्यांचे स्वागत करतील.

या कार्यक्रमास मंत्री, खासदार, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदी उपस्थित राहणार आहेत.
राज्य पातळीवरील प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विविध शाळांतील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच राज्यात जिल्हा आणि तालुका पातळीवरही प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मडगाव जिल्हा पातळीवरील प्रजासत्ताक दिन सोहळ्यास न्यायमंत्री आलेक्स सिक्वेरा राष्ट्रीय तिरंगा फडकवतील तर फोंडा येथील क्रांती मैदानावर होणार्‍या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास कृषिमंत्री रवी नाईक राष्ट्रीय तिरंगा फडकवतील.

त्याचबरोबर तालुका पातळीवरील प्रजासत्ताक दिन सोहळ्यास म्हापसा येथे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, चिखली येथे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, त्याचप्रमाणे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई सांगे येथे राष्ट्रध्वज फडकवतील. जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर काणकोण येथे राष्ट्रध्वज फडकवतील, मत्स्योद्योगमंत्री नीळकंट हळर्णकर पेडणे येथे राष्ट्रध्वज फडकवतील आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर केपे येथे राष्ट्रध्वज फडकवतील. डिचोली येथे मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि सावर्डे मतदारसंघाचे आमदार गणेश गावकर धारबांदोडा येथे राष्ट्रध्वज फडकवणार आहेत. याशिवाय सत्तरीचे जिल्हाधिकारी वाळपई येथे राष्ट्रध्वज फडकवतील.

Trending

Exit mobile version