गोवा खबर

मंत्री राणे यांच्या पुढाकाराने 50 हजार कुटुंबांना भगवद्गीता पुस्तिका वाटप सुरू

Published

on

Spread the love

गोवा खबर : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पुढाकाराने दोन तालुक्यांतील 50 हजार कुटुंबांना भगवद्गीता पुस्तिकेचे वाटप सुरू करण्यात आले आहे. सत्तरी तालुक्यात सुमारे 30 हजार तर डिचोली तालुक्यात 20 हजार कुटुंबांना भगवद्गीता पुस्तिका वितरित केल्या जाणार आहेत.

सुमारे 50 हजार भगवद् गीता पुस्तिका छापण्यात आल्या आहेत. मराठी, संस्कृत भाषेतील पुस्तिका पर्ये, वाळपई मतदारसंघातील सर्वांना पोहोचवण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर डिचोलीत वाटप सुरू होईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

सत्तरी तालुक्यात हे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. दरम्यान, गुरुवारपासून भगवद्गीता पारायण सुरू झाले असून ते 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे. मंत्री राणे यांनी पुढाकार घेऊन भगवद् गीता पारायण व यज्ञ उपक्रम आयोजित केला आहे. विठ्ठलापूर साखळी येथील मंदिर परिसरात पारायण सुरू झाले आहे. यज्ञ, होमहवन व अन्य विधी यांचा त्यात समावेश आहे. वाळवंटी नदीच्या पूजनाचा कार्यक्रम आज 16 रोजी होणार आहे. गंगा पूजनाप्रमाणे वाळवंटी नदीकडे पूजन कार्यक्रम होईल, असे मंत्री यांनी सांगितले.
सुमारे दीडशे ब्राह्मणांच्या सहभागाने विविध विधी सात दिवस होणार आहेत.

 

Trending

Exit mobile version