गोवा खबर

मुख्यमंत्र्यांहस्ते उम्मीद उपक्रमाखाली सायकल आणि शालेय कीटचे वितरण

Published

on

Spread the love

गोवा खबर : उम्मीद या सीएसआर उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा सीएसआर प्राधिकरणाच्या सहकार्याने आरबीएल बॅकेने दान केलेल्या सायकली आणि शाळेच्या कीटचे वितरण केले.

सांखळीतील रविंद्र भवनात सदर कार्यक्रम संपन्न झाला. नऊ शाळांतील मिळून सहावी ते दहावी इयत्तेतील सुमारे २०० मुलींना सायकलचे विरण करण्यात आले.  हा उपक्रम मुलींच्या शिक्षणाच्या सक्षमीकरणावर भर देतो.

या उपक्रमाचे महत्व प्रतिपादून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सुलभ वाहतूक आणि तंदुरूस्ती हे विध्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यामागील हे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे सांगितले. हा प्रयत्न म्हणजे प्रधानमंत्री याच्या बेटी बचाव बेटी पढावो या मोहिमेशी संरेखित आहे. जे शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी आपली बांधिलकी बळकट करते. या सायकलींचा चांगला वापर करण्याचे त्यानी विध्यार्थ्यांना सांगितले.

सीएसआर, आरबीएलचे एचआर प्रमुख बाळकृष्ण नटराजन यांनी उम्मीद उपक्रम आणि बॅकेच्या सामाजिक जबाबदारीची माहिती दिली.

बैठकीस शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, गोवा सीएसआर प्राधिकरणाचे संयुक्त सीईओ विजय सक्सेना, सांखळी रविंद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, आरबीएल बॅंकेचे क्लस्टर प्रमुख तुषार उंडे,  मिलींद विचारे, पालक, शिक्षक, विध्यार्थी आणि आरबीएल बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.

सायली भर्तू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर रोहित अगरवाल यांनी आभार मानले.

Trending

Exit mobile version