गोवा खबर

आपले माजी सैनिक हे आदर्श आणि देशभक्तीचे अमर प्रतीक : पंतप्रधान

Published

on

Spread the love

गोवा खबर : आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या शूर सैनिकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपले माजी सैनिक हे आदर्श आणि देशभक्तीचे अमर प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.   

एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: “सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त, आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या शूर सैनिकांचे  मी आभार व्यक्त करतो. त्यांचे बलिदान, शौर्य आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा ही प्रेरणादायी आहे. आमचे माजी सैनिक हे आदर्श आणि देशभक्तीचे अमर प्रतीक आहेत. आमचे सरकार माजी सैनिकांच्या कल्याणासाठी नेहमीच काम करत आले आहे आणि भविष्यातही करत राहील.”

Trending

Exit mobile version