गोवा खबर

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गगन भरारी शिक्षा योजना

Published

on

Spread the love

गोवा खबर : आदिवासी कल्याण संचालनालयाने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गगन भरारी शिक्षा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून १५ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. 

या योजनेखाली अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजन आणि प्रवासावरील खर्च पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त आर्थिक सहाय्य देतात. अनुसूचित जमातीतील दिव्यांग विध्यार्थ्यांना खर्चासाठी अतिरिक्त अपंगत्व भत्ता देण्याचेही या योजनेचे उद्दिष्ट आहे.

गोवा राज्यातील अनुसूचित जमाती समाजातील विद्यार्थी ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये पाच लाखापेक्षा जास्त नाही आणि मान्यताप्राप्त संस्थेंमध्ये मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रम शिकणारे या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. तसेच विद्यार्थी हा संस्थेचा नियमित आणि पूर्णवेळ विद्यार्थी असावा.

या योजनेंतर्गत डे स्कॉलरसाठी देण्यात येणारा अतिरिक्त देखभाल भत्ता आता रुपये ७५० वरून दरमहा ९०० रूपये वाढविण्यात आला आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विध्यार्ती भत्ता रूपये १,५०० वरून १,८०० रूपये वाढविण्यात आला आहे आणि अतिरिक्त दिव्यांगत्व भत्ता रुपये ७५० वरून दरमहा ९०० रूपये वाढविण्यात आला आहे. ज्यांनी चालू शैक्षणिक वर्षापासून म्हणजे २०२४-२०२५ पासून योजनेसाठी अर्ज केला आहे अशा सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव भत्त्याचा लाभ दिला जाईल. शैक्षणिक वर्षात १० महिन्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

योजनेची तपशीलवार पात्रता आणि इतर अटी ( https://tribalwelfare.goa.gov.in/ ) वर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री शिष्यवृत्ती पोर्टलवर ( https://cmscholarship.goa.gov.in ) ऑनलाइन अर्ज सादर करावे.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२५ अशी आहे.

Trending

Exit mobile version