गोवा खबर : आदिवासी कल्याण संचालनालयातर्फे राज्यातील अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या निम सरकारी संस्थाना मदत करण्यासाठी केंद्रीय आदिवासी मंत्रालय पुरस्कृत योजनेची अंमलबावणी करण्यात येते.
शैक्षणिक क्षेत्रात अनुसूचित जमातीतील विध्यार्थ्यांसाठी अनिवासी शाळा, निवासी शाळा आणि वसतिगृहे चालवणे आणि त्यांची देखभाल करणे, आरोग्य क्षेत्रात, रुग्णालय चालवणे आणि देखभाल करणे, फिरता दवाखाना चालविणे आणि उपजिवीका क्षेत्रात यासारख्या प्रकल्पासाठी अनुदानाचा विचार केला जाईल. आरोग्य क्षेत्रात, रुग्णालय चालवणे आणि देखभाल करणे, 10 किंवा त्याहून अधिक खाटा असलेला दवाखाना आणि फिरता दवाखाना, उपजीविका क्षेत्रात, कृषी, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन, जलसंवर्धन, सेंद्रिय/नैसर्गिक शेती यांसारख्या क्षेत्रात संस्थाना अनुदान देतात.
या योजनेखाली आर्थिक लाभ घेण्यासाठी स्वंयसेवी संस्थानी केंद्रिय आदिवासी मंत्रालयाच्या www.ngo.tribal.gov.in.या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा आदिवासी कल्याण संचालनालय, श्रमशक्ती भवन पाटो पणजी येथे संपर्क साधावा.