गोवा खबर

पणजी येथे चित्रांचे आणि शिल्प कलेचे विशेष प्रदर्शन

Published

on

Spread the love

गोवा खबर : कला आणि संस्कृती संचालनालयाने कला अकादमी, कांपाल, पणजी येथे  १७ ते २६ जानेवारी २०२५ पर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक राष्ट्रीय लोकोत्सवात गोव्यातील कलाकारांच्या चित्रांचे आणि शिल्प कलेचे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. लेखक रवींद्र केळेकर आणि मनोहर राय सरदेसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्यानिमित्ताने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या लोकोत्सवात गोव्यातील कलाकाराना आपले कौशल्य दाखविण्यास संधी प्राप्त होईल.

या प्रदर्शनात भाग घेण्यासाठी गोव्यातील चित्रकार आणि शिल्पकारांकडून  प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. १३ आणि १४ जानेवारीपर्यंत प्रवेशिकाकला अकादमीच्या कार्यालयात सादर कराव्या. चित्रकार आणि शिल्पकारांनी आपले पेंटिंग, शिल्पकला कलाकृतीच्या माहितीसह प्रवेशिकेसोबत सुपूर्द करावे. सदर अर्ज कला आणि संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन, पाटो पणजी येथे उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी ०८३२-२२४०४६३०/ २४०४६०६ वर संपर्क साधा.

Trending

Exit mobile version