गोवा खबर

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी नदीतील क्रूझ पर्यटनांवर गोव्यातील कला, संस्कृती आणि पाककलेच्या प्रचारासाठी नवीन उपाययोजना केल्या सादर

Published

on

Spread the love
गोवा खबर: पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे यांनी गुरूवारी घोषणा केली, की गोव्यातील क्रूझ समुद्र पर्यटनाला आता गोव्यातील कला, संगीताचे प्रदर्शन आणि गोव्यातील पाककृतींमधील पारंपारिक खाध्यपदार्थ देणे आवश्यक असेल. या निर्णयाचा उद्देश स्थानिक कला, संस्कृती, परंपरा आणि गोव्यातील पारंपारिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देणे आहे. नदी क्रूझ ऑपरेटरना या नवीन उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली जाईल, ज्यामुळे पर्यटकांना गोव्याचा अस्सल अनुभव मिळेल.
पर्यटन भागधारक आणि पर्यटन खात्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना, पर्यटन मंत्री खंवटे यांनी भर दिला की, या कृतीमुळे गोव्यातील कलाकारांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.
पर्यटन मंत्री श्री खंवटे यांनी असेही सांगितले, की गोव्याचा अनोखा सांस्कृतिक आणि पाककला वारसा प्रतिबिंबित करणारे घटक समाविष्ट करून, पर्यटन अनुभव वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ते पुढे म्हणाले, की हे उपाय एक तास सवारीची सेवा देणाऱ्या आणि पर्यटन खात्याकडे नोंदणीकृत असलेल्या नदी क्रूझसाठी लागू असतील.
मंत्री खंवटे यांनी पुढे विश्वास व्यक्त केला, की या उपक्रमामुळे केवळ नदीवरील पर्यटनाचा अनुभवच वाढणार नाही तर गोव्याच्या दोलायमान सांस्कृतिक परंपरेला चालना देण्यासही हातभार लागेल.
या बैठकीत सांता मोनिका जेटीशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाल्याचेही मंत्र्यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले, की जेटीचे व्यवस्थापन करणारे ऑपरेटर आणि बोट क्रूझ चालवणारे यांच्यात एक स्पष्ट समन्वय साधणारी नियमावली स्थापित केली जाईल. सुरळीत कामकाज सुनिश्चित करणे, वाद टाळणे आणि ऑपरेटर तसेच पर्यटक दोघांनाही अखंड अनुभव प्रदान करणे, हे या नियमावलीचे उद्दिष्ट आहे.

Trending

Exit mobile version