गोवा खबर:खाण आणि भूगर्भशास्त्र संचालनालयाने मांडवी आणि जुवारी नदीतून रेती उपसा परमीट मंजूर करण्यासाठी स्थानिक व्यक्तिंकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढविली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जानेवारी २०२५ पर्यंत आहे. रेती उपसा भागात, एसओपी आणि इतर माहितीसाठी संचालनालयाच्या https://dmg.goa.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी. तसेच नियंत्रण कक्षाच्या ८८८२९८८००० या क्रमांकावर संपर्क करावा.