गोवा खबर

इंडियन रेडक्रॉस संस्थेची वार्षिक सभा संपन्न

Published

on

Spread the love

 गोवा खबर:भारतीय रेडक्रॉस संस्था गोवा राज्याची वार्षिक सर्वसाधारण सभा राजभवनातील जुना दरबार सभागृहात संपन्न झाली.

यावेळी व्यासपीठावर भारतीय रेडक्रॉस संस्थेचे अध्यक्ष श्री गौरीश धोंड, उपाध्यक्ष मांगिरीश पै रायकर, सरचिटणीस श्री जॉन आगियार आणि खजिनदार मारियो पिंटो डी सांताना उपस्थित होते.

सुरवातीस भारतीय रेडक्रॉस संस्थेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष श्री मांगिरीश पै रायकर यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सादर केले.

श्री गौरीश धोंड यांनी २०२३-२४ चा वार्षिक प्रशासकीय अहवालही सादर केला.

राज्यपालांनी आपल्या संदेशात इंडियन रेड क्रॉस संस्था ही एक मानवतावादी संस्था आहे जी समाजातील गरजू आणि वंचित लोकांना मदत करण्यासाठी काम करते असे सांगितले. ही संस्था आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहीम, मोफत वैद्यकीय मदत, समुपदेशन इत्यादी विविध उपक्रमांद्वारे अथक परिश्रम करीत आहे. भारतीय रेड क्रॉस ही रक्त सेवेच्या क्षेत्रातील अग्रणी आणि भारतातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी रक्तपेढ्यांपैकी एक आहे. विकासासाठी आणि भारतीय आरोग्य-प्रणालीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सदर संस्था समर्पित आहे असे राज्यपाल म्हणाले.

विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट रेडक्रॉस स्वयंसेवक आणि उत्कृष्ट रेडक्रॉस तालुका शाखेचा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. सुवर्णा फोन्सेका यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. लेनी डिकोस्ता यांनी आभार मानले.

Trending

Exit mobile version