गोवा खबर

मेगा अपार दिवस साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर:मेगा अपार दिवस यशस्वीपणे पूर्ण करून गोवा शिक्षण क्षेत्राने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या केंद्रीत उपक्रमाचा उद्देश अपार आयडीच्या निर्मितीला गती देणे हा आहे. शिक्षण संचालनालयाने राज्यात  ९ आणि १० डिसेंबर रोजी मेगा अपार दिवस मोहीम यशस्वीपणे राबविली असून , प्रमुख शाळांमधील ७० टक्के विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणी पूर्ण केली आहे . मेगा अपार दिवसांमध्ये, सर्व शाळा युडीआयएसई  पोर्टलवर  विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यात आणि अपारआयडी तयार करण्यात गुंतल्या होत्या.

मेगा अपार दिवस मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, राज्याचे प्रकल्प संचालक व एस.सी.ई.आर.टीच्या संचालिका सौ.सरिता गाडगीळ यांनी संबंधित अधिकारी व शिक्षकांना योग्य मार्गदर्शन केले.

ते म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेत कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी अपार आयडी महत्त्वाचा आहे.  हा  उपक्रम म्हणजे  ‘ वन नेशन ,  वन स्टुडंट आयडी ‘ कार्यक्रम आणि २०२० राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संरेखित आहे

स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी ( APAAR) आयडी प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे शाळांमध्ये विद्यार्थी नोंदणी , सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक नोंदणी आणि इतर नोंदी पद्धतशीरपणे ठेवण्यासाठी पोर्टलची रचना करण्यात आली आहे .

अपार आयडी नोंदणी मेगा अपार डे मोहिमेच्या एका दिवसात २५,१०० वरून ४१,६०० वर पोहोचली आहे. प्रत्येक विभागांमधील उत्कृष्ट २० शाळांनी अपार आयडी नोंदणी प्रक्रिया ७० टक्क्यांहून अधिक पूर्ण केली आहे. राज्याने पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांसाठी २० जानेवारी २०२५ पर्यंत अपार आयडी नोंदणीची ७० टक्के आणि माध्यमिक शाळांसाठी १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

अपार आयडी हा देशभरातील  शाळांमध्ये नोंदणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास  दिलेला १२-अंकी ओळख क्रमांक आहे. हा आयडी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  प्रगतीची माहिती नोंद करण्यासाठी  डिजिटल लॉकर म्हणून काम करते, ज्यामध्ये  परीक्षेचा निकाल, प्रमाणपत्रे आणि इतर माहिती आणि दाखल्यांची नोंद असते.

Trending

Exit mobile version