गोवा खबर

फोंडा येथे गोवा मुक्ती दिन साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर:फोंडा येथील ऐतिहासिक क्रांती मैदानावर गोवा मुक्ती दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. कृषी मंत्री श्री रवी नाईक यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय तिरंगा फडकविला आणि संचलनाची पाहणी केली.  

      यावेळी उपस्थितांसमोर बोलताना श्री. रवी नाईक यांनी गोवा एकात्मतेसाठी प्रसिद्ध असल्याचे सांगून विविध धर्माच्या लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यप्राप्तीपासून जातीय सलोखा राखल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. श्री नाईक यांनी डॉ राम मनोहर लोहिया यांच्या पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त करण्यात भरीव योगदानावर प्रकाश टाकला. युवा पिढीने या ऐतिहासिक चळवळीची नेहमी जपणूक करून राज्याच्या उन्नतीसाठी काम करावे, असेही मंत्री श्री नाईक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. आम्ही या प्रवासाचा सन्मान करूया आणि भविष्याकडे वाटचाल करूया. गोवा सलोखा, संस्कृती आणि समृद्धीचा दिवा म्हणून भरभराटीला येईल असे नाईक म्हणाले. गोवा हे लहान राज्य असूनही गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण, संस्कृती, पायाभूत सुविधा, क्रीडा आणि आरोग्य या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय विकास साधला असल्याचे त्यांनी सांगितले. मानवी प्रयत्नांच्या सर्व क्षेत्रात प्रगती आणि विकासासाठी सर्व समुदायांनी सहकार्य करावे आणि एकत्र काम करावे असे आवाहन त्यांनी केले. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयकाच्या अंमलबजावणीचे महत्त्वही मंत्र्यांनी यावेळी प्रतिपादले.

यावेळी अनिवासी भारतीय आयुक्त श्री नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष श्री आनंद नाईक, स्वातंत्र्यसैनिक, कमांडिंग ऑफिसर ६ टीटीआर, फोंडा, कर्नल निरज नटुअल, नगरसेवक, जि.प.सदस्य, सरपंच, सरकारी अधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. एजे डी आल्मेदा हायस्कूल, प्रगती विद्यालय, बोरी, लोकविश्वास प्रतिष्ठान ढवळी, सरकारी हायस्कूल, फोंडा, सरकारी हायस्कूल बेतोडा, सरकारी हायस्कूल, जुना बाजार, सरकारी हायस्कूल, धावशिरे, एमआयबीके हायस्कूल, खांडेपार आणि ढवळी फोंडा येथील एसएस समिती हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

सुरवातीस कृषी मंत्र्यांचे उपजिल्हाधिकारी श्री शुभम नाईक आणि पोलीस उपअधिक्षक श्री शिवराम वायंगणकर, यांनी त्यांचे स्वागत केले

Trending

Exit mobile version