गोवा खबर

राज्पपाल पीएस श्रीधरन पिल्लई याच्यांकडून  गोव्यातील लोकांना गोवा  मुक्ती दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री. पी एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील  लोकांना गोवा  मुक्ती दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, १९६१ च्या या गौरवशाली दिवशी पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त झाला. हा दिवस संस्मरणिय आहे कारण गोवा मुक्तीच्या दिनाने भारताचे स्वप्न पूर्ण झाले. महोत्सवाच्या या ऐतिहासिक सोहळ्यात सामील होताना मला अभिमान वाटतो. या आजच्या दिवशी  मी गोव्याच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो.

गोवा १५१० ते १९६१ पर्यंत ४५० वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीज वसाहतींच्या अधिपत्याखाली होता. जसे आपण सर्व जाणतो की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण गोवा भारतीय उपखंडाचा भाग असूनही पोर्तुगीजांच्या नियंत्रणाखाली राहिला. १९६१ च्या या ऐतिहासिक दिवशी भारतीय सैन्याने आपल्या धैर्याने गोव्याला ४५० वर्षांच्या पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीच्या बंधनातून मुक्त केले आणि गोवा भारताचा अविभाज्य भाग बनला. स्वातंत्र्याचा प्रवास लांब आणि खडतर होता. गोवा आणि भारताच्या इतर भागांतील स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या मुक्तीच्या लढ्यात अनेक कष्ट सोसले आणि त्यांना बलिदान द्यावे लागले. या ऐतिहासिक प्रसंगी धाडसी आणि पराक्रमी सैनिकांना तसेच निस्वार्थ स्वातंत्र्यसैनिकांना आम्ही नमन करणे योग्य आहे. तसेच गोवा मुक्तीसाठी आपल्या मौल्यवान प्राणाचा त्याग केलेल्या त्या महान आत्म्यांना आदरांजली वाहुया.

गोव्याची एक वेगळी ओळख आहे की गोव्याच्या लोकांनी विविध आव्हानांना तोंड देत स्वातंत्र्यानंतरच्या काळात जतन आणि संरक्षण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले. १९६७ च्या ओपिनियन पोलने गोव्याची ही खास ओळख झाली. १९८७ मध्ये राज्याला मिळालेला घटक राज्याचा दर्जा हा आपला वेगळा वारसा टिकवून ठेवण्याच्या प्रवासातील एक महत्वाचा प्रसंग आहे. भारतीय राज्यघटनेच्या ८ व्या परिशिष्ठात कोंकणीचा समावेश केल्याने राज्याची अस्मिता अधिक दृढ झाली. ही खास ओळख टिकवून ठेवण्यासाठी कठोर संघर्ष केला त्याबद्दल गोव्यातील सर्व नेत्यांचे आणि जनतेचे मी अभिनंदन करतो.

 पर्यटन क्षेत्र हे गोव्याच्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख घटकांपैकी एक आहे. गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. गोवा हा वनसंपदेने परिपूर्ण आहे. याशिवाय  राज्याला एक उच्च संस्कृती आणि वारसा आहे तसेच गोव्यातील लोक मैत्रीपूर्ण आणि शांतताप्रिय आहेत. गोव्यात विविध समुदायातील लोक सलोख्याने नांदतात आणि अशा या गोव्याच्या विलक्षण सौंदर्यामुळे ते जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे.

     सध्या गोवा हे आधुनिक आणि गतीने पुढे वाटचाल करणारे राज्य आहे. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या अहवालाप्रमाणे जीवनाच्या दर्जा संबंधित १२ मुख्य दर्शकात गोवा देशांतील राज्य आणि संघप्रदेशांमध्ये उंच क्रमाकावर आहे. शिक्षण, आरोग्य, साधनसुविधा आणि गुंतवणुकीच्या बाबतीत देशांतील सर्व राज्यांमध्ये गोवा उत्कृष्ट क्रमांकाचे राज्य बनले आहे. साक्षरता आणि बालमृत्यू प्रमाण अशा सामाजिक दर्शकाबाबतीत गोवा देशांत पहिल्या तीन राज्यांमध्ये वरील क्रमांकावर आहे. साधनसुविधांच्या बाबतीत अकराव्या वित्त आयोगाने गोव्याला उत्कृष्ट राज्य म्हणून जाहीर केले आहे.

परंतु अधिक  महत्वाचे म्हणजे, गोवा हे विशिष्ट्य बहुसांस्कृतिक वारसा लाभलेले राज्य आहे. गोव्यातील लोक चांगल्या मनाचे, शांत, प्रिय आणि मित्रत्वाच्या स्वभावाचे आहेत. गोव्यात विविध समाज्यातील लोक सलोख्याने राहतात. गोवा हे आकाराने देशातील एक लहान राज्य असले तरी देशांतील अधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य आहे. देशांत गोव्याचे आर्थिक विकासाचे प्रमाण अधिक आहे. गोवा राज्य रस्ते, रेल्वे, समुद्र मार्ग तसेच विमान वाहतूकीव्दारे मुख्य शहर आणि व्यापार तसेच वाणिज्य केंद्रास जोडलेले आहे.

सध्याचे राज्य सरकार रस्ते, रेल्वे, विमानतळ, पूल अशा साधनसुविधां उपलब्ध करून गोव्याची प्रगती आणि विकासासाठी प्रशंसनिय काम करते. यावर्षी मोपा येथील मनोहर पर्रीकर विमानतळाला उत्कृष्ट डॉमेस्टिक विमानतळ म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.

क्रिडा आणि पर्यटनाव्यतिरिक्त गोव्याला हल्ली देशभर आणखीन एक ओळख मिळाली आहे.राज्य सरकार गोव्याला एक मुख्य शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे नेते. येथील अनेक संस्था देशभरातील विध्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करते. हल्लीच प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी गोव्यात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या कायम कॅम्पसचे उद्घाटन करून राज्याच्या शैक्षणिक साधनसुविधांच्या विकासात भर घातली आहे.

 स्वयंपूर्ण मित्रांच्या पाठिंब्याने राज्य सरकारने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा या प्रमुख योजनेची पूर्ण जोमाने अमंलबजावणी केली आहे. स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमांतर्गत एकत्रित प्रयत्नांमुळे, १८ विविध पारंपारिक व्यवसायांतर्गत सुमारे ३३.००० श्रमजीवींची नोंदणी झाली आहे. या श्रमजीवींसाठी प्रशिक्षण सुरू करणारे गोवा हे पहिले राज्य आहे.

उत्कष्ट सेवा आणि प्रशासनातून गोवा हे स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर राज्य करण्याच्या उद्देशाने गोवा सरकारने भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत-गरिब कल्याण कार्यक्रमाच्या धर्तीवर स्वयंपूर्ण गोवा अभियान सुरू केले आहे. गावांचा विकास साधून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणे हा या कार्यक्रमाचा एकमेव उद्देश आहे.

प्रत्येक गोमंतकीयांच्या जीवनात परिवर्तन आणून गोवा आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय तत्वावर काम करते. सरकारच्या योजना, सेवा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी स्थानिक संस्था, सरकारी खाते आणि स्वयंपूर्ण मित्रांच्या सहकार्याने विशेष उपक्रम राबविण्यात येतात.

माननिय मुख्यमंत्र्याच्या कुशल नेतृत्वाखाली राज्याने “गोवा मुख्यमंत्री अप्रेंटिसशीप धोरण” ची अंमलबजावणी केली आहे. या धोरणाखाली एसएससी, एचएसएससी, पदवीधर, आयटीआय उत्तीर्ण युवकांना अप्रेंटिसशीप प्रशिक्षण योजनेखाली नोंदणी करून सरकारी खात्यांनी एक वर्ष काम करणाऱ्या अनुभव आणि मासिक विद्यावेतनाचा लाभ घेण्याची संधी दिलीआहे.

मुख्यमंत्री “विकसित भारत २०४७” संकल्पना नजरेसमोर ठेऊन स्वयंपूर्ण गोवा आणि विकसित गोव्यासाठी नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण अशा कल्याणकारी योजनेवर भर देतो.

मला सांगण्यास अतिआनंद होतो की राजभवनच्या भागात  वामन वृक्ष कला उद्यान – बोन्साय उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात २२२ जातींची १००८ बोन्साय झाडे लावली आहेत. राजभवनाच्या तीन लॉनमध्ये वामन वृक्ष कला उद्यानाचा विस्तार झाला आहे. सरकारी जमिनीत उभारलेले हे सर्वात मोठे वामन वृक्ष उद्यान आहे. राजभवनात प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवशी राजभवन भागातील शेकडो वर्षाच्या झाडांचे जतन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

राजभवनने वामन वृक्ष कला उद्यानात  भारतीय आयुर्वेदाचे जनक आचार्य चरक आणि शस्त्रक्रिया क्षेत्रांतील जनक आचार्य सुश्रृत या दोघांचा पुतळा उभारून त्यांना श्रध्दाजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे. प्राचीन भारतीय वैद्यकियशास्त्रातील  जनक आचार्य चरक आणि आचार्य सुश्रृत यांनी चरक संहिता आणि  सुश्रृत संहिता लिहीली असून ही संहिता सुत्र, निदान, विमना, सरिरा, इंद्रिया, चिकित्सा, कल्प आणि सिध्द अशा आठ भागांनी विभागलेली आहे. चरक हे आयुर्वेदाचे जनक होते. त्यांनी शरीरशास्त्र, आहार आणि मेटाबोलिजमचा  अभ्यास करून  आयुर्वेद वैध्यकिय क्षेत्राला महत्वाचे योगदान दिले आहे. आयुर्वेदाचे जनक असलेले चरक यांना पुरातन भारताच्या वैध्यकिय वारशाचे श्रेय प्राप्त झाले आहे.

आपल्या देशाने नव्या संकल्पनासह “अमृत काळात” प्रवेश केला आणि “विकसित भारत ” म्हणून २०४७ पर्यंत समाविष्ट आणि विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने पावले उभारत आहे. आजच्या याप्रसंगी आपण सर्वांनी आमच्या मुलभूत कर्तव्याचे पालन करण्याची शपथ घेऊया आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात श्रेष्ठता गाठण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया, जेणे करून गोवा प्रगतीच्या क्षेत्रात  उच्च शिखरावर वाटचाल करीत राहील असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version