गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृष्णा यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

Published

on

Spread the love

गोवा खबर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटकमध्ये पायाभूत सेवा सुविधांचा विकास घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे एस. एम. कृष्णा एक उल्लेखनीय नेते होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, कृष्णा हे एक असै उल्लेखनीय नेते होते, ज्यांचे कौतुक सर्व स्तरातील लोक  करतात. त्यांनी नेहमीच इतरांचे जीवनमान सुधारण्यासाठी  अथक परिश्रम घेतले. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळासाठी, विशेषत: पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल ते सर्वांच्या स्मरणात आहेत. एस.एम. कृष्णा हे विपुल वाचन करणारे विचारवंत होते.

Trending

Exit mobile version