गोवा खबर

गोवा राज्य नागरी सेवा क्रीडा संघ निवड चाचणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : अखिल भारतीय नागरी सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ आणि एनसीटी दिल्ली सरकारच्या सहकार्याने राजधानी शहरातील विविध ठिकाणी 16 डिसेंबर ते 10 जानेवारी 2025 पर्यंत अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन, क्रिकेट, बास्केटबॉल, कबड्डी आणि टेबल टेनिस या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या क्रीडा स्पर्धेत गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्यास संघाची निवड करण्यासाठी क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने निवड चाचणीचे आयोजन केले आहे.

टेबल टेनिस स्पर्धेसाठी 10 डिसेंबर रोजी कांपाल इनडोअर स्टेडिटम, बॅडमिंटन 20 आणि 21 डिसेंबर रोजी कांपाल इंनडोअर स्टेडियम, बास्केटबॉल 20 डिसेंबर रोजी मिरामार युथ हॉस्टेल, कबड्डी 18 डिसेंबर रोजी सर्किट हाऊस, आल्तिनो, पणजी आणि क्रिकेट 17 आणि 18 डिसेंबर 2024 रोजी कांपाल येथील खुल्या मैदानावर निवड चाचणी होणार आहे.

सरकारी खात्याचे नियमित कर्मचारी असलेल्या इच्छुक खेळाडूंनी खात्याच्या प्रमुखांनी सही केलेले ओळखपत्र आणि योग्य खेळाच्या किटसह सकाळी 9.30 वाजता कार्यक्रमस्थळी एसएसओ अनंत सावळ यांच्याशी (9975120049) संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version