गोवा खबर

निवडणूक काळात दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

Published

on

Spread the love

गोवा खबर:उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुक्यातील नानोडा ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणूकीमुळे ७, ८ आणि ९ डिसेंबर रोजी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी सरकारने सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल असा फलक बाहेर लावावा.

Trending

Exit mobile version