~रस्त्यावरील सुरक्षतेला प्राधान्य देत यंदाच्या आवृत्तीची घोषणा.
गोवा खबर: गल्फ सिंट्रॅकच्या सहकार्याने आयोजित इंडिया बाईक वीक आपल्या ११व्या आवृत्तीसह वागातोर येथे परतला आहे. हा कार्यक्रम ६ आणि ७ डिसेंबर रोजी होणार आहे. ‘एव्हरीवन अॅज वन’ म्हणजे ‘आम्ही सगळे एक’ हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आयबीडब्ल्यूच्या यंदाच्या आवृत्तीत ‘नेक्स्ट चॅप्टर’ या विशेष वैशिष्ट्याअंतर्गत एफएमएससीआयशी संलग्न दोन रोमांचक रेस आयोजित करण्यात येणार आहेत. या दोन रेस म्हणजे रेस मोटो प्रायोजित ‘आयबीडब्ल्यू हिल क्लाइंब’ आणि हार्ले-डेव्हिडसनसोबतची ‘फ्लॅट ट्रॅक रेस’. प्रत्येक रेस रेसिंगचा उत्कृष्ट अनुभव तसेच आव्हानात्मक रोमांच आणि थरार प्रदान करेल,” अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे, यावेळी दोन मजेशीर रेसट्रॅक्सही आहेत- गल्फ सिंट्रॅक टिवरा अॅक्शन गेम्स आणि रेइस मोटोतर्फे सादर होणारी आयबीडब्ल्यू डर्ट डॅश. केवायटी रायडर आणि माजी मोटो जीपी/ले मॅन्स रायडर झेविअस सिमोन यावेळी दोन्ही दिवशी मीट अॅण्ड ग्रीट उपक्रमात आपल्या रेसिंग करिअरबद्दल चाहत्यांसोबत गप्पा मारतील.
रस्ते सुरक्षा आणि जबाबदार रायडिंगला केंद्रस्थानी ठेवत ‘सुरक्षा’ हा महत्त्वाचा घटक आपल्याला ह्या आवृत्तीत पाहायला मिळणार. हावलिंग डॉग स्टेजवरील जसविन बोस यांचे रस्ते सुरक्षा सत्र, निखिल सूद यांचे ऑफ-रोडिंगचे मार्गदर्शन, तसेच महाविद्यालयीन पातळीवर सुरक्षित बाइकिंगसाठी विशेष सत्रे आयोजित करून, आयबीडब्ल्यूने रायडर्समध्ये सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.