गोवा खबर

टेक मीडिया स्टार्टअप एक्स्पो २०२४ चा २रा दिवस : मीडियामधील एआय आणि अर्थपूर्ण उद्योग सहयोगावर भर

Published

on

Spread the love

गोवा खबर : टेक मीडिया स्टार्टअप एक्स्पो २०२४च्या दुसऱ्या दिवशी “माइंड ऑफ द मशीन: जेनएआय इन मीडिया” या संकल्पनेवर आधारित अधिक माहिती मिळविण्यासाठी विचारवंत, चित्रपट निर्माते, तंत्रज्ञान उत्साही आणि जागतिक सहभागींना एकत्र आणले. या कार्यक्रमाने चित्रपट निर्मिती, पटकथा लेखन आणि प्रेक्षकांच्या सहभागामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी जनरेटिव्ह एआयची क्षमता प्रदर्शित केली, तसेच उद्योग व्यावसायिकांमधील मौल्यवान सहकार्याला प्रोत्साहन दिले.

स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलचे सीईओ डीएस प्रशांत यांनी त्यांच्या सुरुवातीच्या भाषणात उपस्थितांचे स्वागत केले आणि शिकण्यासाठी, सहयोगासाठी आणि नाविन्यपूर्णतेसाठी एक व्यासपीठ तयार करणे, या एक्स्पोच्या उद्दिष्टावर भर दिला. गतवर्षीच्या कार्यक्रमाविषयी बोलताना त्यांनी नमूद केले, आम्ही इफ्फीच्या समांतर पहिल्या आवृत्तीपासून सुरुवात केली आणि या वर्षी आम्ही मुख्य प्रवाहातील फिल्म बाजारचा भाग आहोत. यापुढे, गोव्याला भारताची सर्जनशील राजधानी बनवण्यासाठी, आम्ही त्याचा आणखी विस्तार करू. त्यांनी पुनरुच्चार केला, सततची भागीदारी, समुदाय उभारणीचे प्रयत्न आणि एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा चित्रपट निर्मिती आणि कथाकथनात वापर याद्वारे, हा एक्स्पो गोव्याला निर्माते आणि नवोदितांसाठी एक प्रेरणास्थान बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

फिल्म बाजारने स्पेन आणि जपानच्या प्रतिनिधींसह आंतरराष्ट्रीय आणि राज्य-स्तरीय स्टॉल्सचे विविध मिश्रण आयोजित केले होते. विदेशी आणि जपानी प्रतिनिधींसह अभ्यागतांनी, कार्यक्रमाच्या जागतिक आवाहनाला अधोरेखित करून अर्थपूर्ण चर्चा केली.

आयबीएचे संस्थापक आणि सीईओ राज कपूर यांनी “द पॉवर ऑफ पर्पज: युजिंग फिल्म फॉर सोशल चेंज” या विषयावर विचार व्यक्त केले. त्यांनी प्रेक्षकांना वैयक्तिक स्पर्शाने गुंतवून, त्यांच्या आवडत्या चित्रपटांबद्दल विचारून आणि अनारी, द शॉशांक रिडेम्प्शन, ला विटा ए बेला, आणि द पर्सुइट ऑफ हॅप्पीनेस सारख्या चित्रपटांनी त्याच्या जीवनावर कसा प्रभाव पाडला, हे सांगून आपल्या सत्राला सुरुवात केली. त्यांनी ठळकपणे सांगितले, कि “जर तुमचा आत्मा तुटला असेल, तर त्या तुकड्यांपासून कला बनवा. चित्रपटांमध्ये आशा आणि बदल घडवून आणण्याची शक्ती असते. चित्रपट आपल्याला सीमा ओलांडण्यास आणि उज्ज्वल उद्यावर विश्वास ठेवण्यास शिकवतात.”

रॉक्ड फिल्म्सच्या कंटेंट प्रमुख देबश्रीता दत्ता यांनी घेतलेल्या पहिल्या पॅनल चर्चेत “हाव जेनएआय शेपिंग फिल्ममेकिंग, स्क्रिप्ट रायटिंग अँड द फ्युचर ऑफ न्यूज?” या विषयावर चर्चा झाली. पॅनेल सदस्य पीवायसी संस्थापक स्नेहल ध्रुव आणि संस्थापक, अध्यक्ष आणि एमडी, एस पी सिनेकॉर्प शरद पटेल यांनी काम सुलभ करण्यासाठी, व्हिज्युअल कथाकथन वाढवण्यासाठी आणि तंत्रज्ञांन प्री-आणि पोस्ट-प्रॉडक्शनसाठी प्रगत साधनांशी जुळवून घेण्यास, एआयच्या भूमिकेवर भर दिला. तथापि, त्यांनी सर्जनशीलता आणि मौलिकता टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावर भर दित, मजकूर तयार करण्यासाठी एआयवर पूर्णपणे अवलंबून राहण्यापासून सावधगिरी बाळगावी, असे सांगितले.

दुसऱ्या पॅनलमध्ये, “कॅन एआय बी क्रिएटिव्ह?” या विषयावर संस्थापक आणि सीईओ, क्लियोस एंटरटेनमेंट गायत्री जिउलियानी यांनी मॉडरेटरची भूमिका बजावली. क्रिएटिव्ह उद्योगांमध्ये एआयच्या नैतिक आणि व्यावहारिक परिणामांवर आधारित विषयावर यावेळी चर्चा झाली. पॅनेलचे सदस्य, संचालक ग्लोबल पार्टनरशिप अँड अलायन्सेस आयबीए जेर्विस परेरा, आणि संस्थापक सीईओ आयबीए राज कपूर यांनी वैद्यकीय निदान, संवेदी विश्लेषण आणि सामग्री वैयक्तिकरण यांसारख्या क्षेत्रात एआयच्या अनुप्रयोगावर चर्चा केली आणि पुनरुच्चार करताना सांगितले, की एआय हे मानवी सर्जनशीलतेला बदली नसून, एक सहाय्यक साधन म्हणून काम करते. एआयचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी संतुलित प्रशिक्षण मॉडेल्स आणि नैतिक मर्यादेची मागणी केली.

या चर्चेने एक गंभीर संदेश अधोरेखित केला: एआय नोकऱ्यांसाठी धोका नाही तर स्वीकारण्यास इच्छुक असलेल्यांसाठी एआय उत्प्रेरक आहे. पॅनेल सदस्य जेर्विस परेरा म्हणाले,  “एआय माणसांची जागा घेणार नाही; तर एआय वापरत नसलेल्या माणसांची जागा घेईल.”

Trending

Exit mobile version